शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इंग्लंडमधील सुंदर आयलंड विक्रीला, जाणून घ्या किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 1:44 PM

1 / 5
एक पूर्ण आयलंड विक्रीला काढण्यात आलं आहे. आणि या सुंदर आयलंडची किंमत ५८ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे आयलंड विकत घेणारा व्यक्ती इथे हॉटेल किंवा रिसॉर्ट तयार करु शकतो. इतकेच नाही तर या आयलंडला ऐतिहासिक महत्त्वही आहे. (All Image Credit - Google)
2 / 5
इंग्लंडच्या डेवन तटावर स्थित हे ड्रेक आयलंड आहे. या आयलंडवर नेपोलियनच्या काळातील काही इमारती आहेत. पण आता मानलं जात आहे की, हे आयलंड आता एका लक्झरी रिट्रीटसाठी वापरलं जाऊ शकतं.
3 / 5
आयलंडचं एकूण क्षेत्रफळ ६ एकर आहे. या आयलंडचं नाव एसआय फ्रान्सिस ड्रेक याच्या नावावर ठेवण्यात आलं. हा व्यक्ती १५७७ मध्ये बोट चालवत या आयलंडवर पोहोचला होता.
4 / 5
डॅन मॅकुले असं या आयलंडच्या मालकाचं नाव आहे. त्यांचा मुलगा ऐडन म्हणाला की, वडिलांना वाटतं की, या आयलंडचा योग्य वापर व्हावा. या आयलंडवर स्पा आणि हॉटेल उभारण्याची परवानगी मिळाली आहे.
5 / 5
मॅकुलेने हे आयलंड १९९० मध्ये खेरदी केलं होतं. एका रिअल इस्टेट एजंटने आयलंड खरेदी करणाऱ्या लोकांना गाईड प्राईस म्हणून याची किंमत ५८ कोटी रुपये सांगितली आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेEnglandइंग्लंड