भारताच्या राष्ट्रपतींच्या कारला 'नंबर प्लेट' का नसते? जाणून घ्या यामागचं मोठं कारण....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 16:10 IST
1 / 8भारतात सर्वच गाड्यांवर नंबर प्लेट बघायला मिळते. नंबर प्लेटमुळे गाडी आणि गाडीच्या मालकाची ओळख पटते. भारतात जर विना नंबर प्लेट गाडी चालवली तर तुमच्यासोबत काय होईल हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. मात्र, भारतात अशाही काही गाड्या आहेत ज्यांवर नंबर प्लेट नसते. अशात असा प्रश्न उपस्थित राहतो की, या गाड्यांवर नंबर प्लेट का नसतात आणि तरी ते या गाड्या चालवू कसे शकतात?2 / 8आज आम्ही ज्या गाड्यांबाबत सांगत आहोत त्या फारच खास आहेत. या गाड्यांवर ना नंबर प्लेट असते ना भारतीय कायदा यांना रस्त्यावर चालण्यापासून रोखू शकत. यामागे आहे मोठं कारण. या गाड्या भारताच्या राष्ट्रपतींच्या ताफ्यातील गाड्या असतात.3 / 8भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असल्याने त्यांना अति खास व्यक्तींच्या श्रेणीत ठेवलं आहे. भारताचे राष्ट्रपती हे केवळ राष्ट्रपतीच नाही तर तिन्ही दलाचे प्रमुख असतात. त्यामुळे राष्ट्रपतींना भारतीय संविधानाचे सामान्य नागरिकांच्या हेतुने तयार केलेले नियम पाळण्यातून सुट मिळाली आहे.4 / 8भारताच्या राष्ट्रपतींना अनेक विषेशाधिकार मिळाले आहेत. ज्यांचा वापर ते कधीही करू शकतात. ते नियमानुसार एखाद्या कैद्याची मृत्यूदंडाची शिक्षा कमी करू शकतात.5 / 8जर तुम्ही प्रजासत्ताक दिवसाला पाहिलं तर राष्ट्रपतींच्या ताफ्यात अनेक गाड्या असतात. या सर्व गाड्यांवर कोणत्याही प्रकारच्या नंबर प्लेट नसतात. यामागे शेकडो वर्षापासून चालत आलेला एक नियम आहे.6 / 8इंग्रजांनी भारतावर साधारण २०० वर्ष राज्य केलं. इंग्रज भारत सोडून गेले त्यालाही बरीच वर्ष झाली. पण त्यांनी बनवलेले नियम आजही भारतात लागू आहेत. त्यातीलच एक नियम म्हणजे 'The King Can Do No Wrong' हा आहे. याचा अर्थ होतो की, 'राजा कोणतीही चूक करू शकत नाही'. या नियमानुसारच भारताच्या राष्ट्रपतींच्या कारवर नंबर प्लेट नसते.7 / 8भारताच्या राष्ट्रपतींशिवाय उपराष्ट्रपती, राज्यांचे राज्यपाल आणि काही इतरही VVIP गाड्यांवरही नंबर प्लेट नसतात. VVIP लोकांच्या कारवर नंबर प्लेट नसण्याचं कार त्यांची सुरक्षा आहे. त्यांच्या कारवर नंबर प्लेटऐवजी अशोक स्तंभ असतो.8 / 8सध्य भारतीय विदेश मंत्रालयाकडे साधारण १४ कार आहे. या कार विना रजिस्ट्रेशन चालवल्या जातात. सामान्यपणे या कार्सचा वापर परदेशी पाहुण्यांसाठी केला जातो.