शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चक्क एका कुत्र्यामुळं झालं होतं दोन देशांमध्ये भीषण युद्ध; हैराण करणारी ही अजब कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 5:26 PM

1 / 10
इतिहासात अनेक युद्ध आपण ऐकले असतील. ज्यात जागतिक महायुद्धासारख्या युद्धांचाही समावेश आहे. प्रत्येक लढाई ही कधी सत्तेसाठी किंवा राज्याच्या विस्तारासाठी झालेली आहे.
2 / 10
आज आम्ही तुम्हाला अशी कहाणी सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही, ज्यामुळे तुम्हीही विचारात पडाल. युरोपात दोन देशात झालेले युद्ध एका किरकोळ कारणासाठी झालं होतं, ही इतिहासातील जुनी आणि अजब कहाणी आहे.
3 / 10
१९२५ मध्ये ग्रीस(यूनान) आणि बुल्गारिया या देशात तणावाचं वातावरण होतं. एका कुत्र्यामुळे या दोन देशांमध्ये युद्ध सुरु होतं. हो हे खरं आहे या दोन देशातील युद्धाचं कारण एक कुत्रा होता.
4 / 10
ग्रीसमधील एक कुत्रा चुकीने मैसेडोनियाची सीमा पार करतो, त्या कुत्र्याला पकडण्यासाठी त्याचा मालक जो ग्रीस सेनेतील एक शिपाई होता, तो मैसेडोनियाच्या सीमेत प्रवेश करतो.
5 / 10
त्यावेळी मैसेडोनियाच्या सीमा सुरक्षेची जबाबदारी बुल्गारियाच्या सैनिकांवर होती. जेव्हा बुल्गारियाच्या सैनिकांनी ग्रीसच्या सैनिकाला त्यांच्या सीमेत प्रवेश करताना पाहिलं तेव्हा काही विचार न करता त्यांनी गोळी झाडून त्याची हत्या केली.
6 / 10
या घटनेचा परिणाम असा झाला की, या दोन्ही देशातील तणाव वाढला. राजकीय तणाव आणि सैनिकाच्या हत्येने नाराज ग्रीसने बुल्गारिया देशावर हल्ला केला.
7 / 10
ग्रीस आणि बुल्गारिया यांच्यात १८ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबरपर्यंत युद्ध सुरु होतं. या युद्धात ५० लोकांचा मृत्यू झाला होता. हे युद्ध बुल्गारियाने जिंकले. पण यानंतर या देशात एक तडजोड करण्यात आली.
8 / 10
युद्धामुळे बुल्गारियामध्ये जितकं नुकसान झालं त्याची भरपाई ग्रीसला करावी लागली. ग्रीसने दंड म्हणून बुल्गारियाला ४५ हजार पाउंड म्हणजे जवळपास ४३ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून दिली.
9 / 10
या युद्धाला पेट्रीक ची घटना म्हणून ओळखली जाते. एका कुत्र्यामुळे दोन देशांमध्ये झालेलं युद्ध आणि लोकांचे गेलेले जीव हे पाहता मुर्खपणाचे युद्ध वाटतं.
10 / 10
पण या कहाणीमुळे हे युद्ध अनेकांच्या लक्षात राहिलं आहे. कदाचित भविष्यात असा चुकीचा प्रकार पुन्हा कोणी करणार नाही.
टॅग्स :warयुद्धdogकुत्रा