ख्रिसमसला इथे कपडे न घालता केली जाते पार्टी, लोक भरभरून घेतात सहभाग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 12:24 IST2024-12-24T12:00:53+5:302024-12-24T12:24:26+5:30

हा एक अनोखा आणि साहसी अनुभव असून न्युडिज्मला प्रोत्साहन देतो. नॅचरल लाइफस्टाईल फॉलो करणाऱ्या लोकांमध्ये हा इव्हेंट खूप लोकप्रिय आहे.

Christmas Party: ब्रिटनच्या वेस्ट मिडलॅंड्सच्या बर्मिंघम येथील हॉटेल क्लोवर स्पा अॅन्ड हॉटेल ख्रिसमसमध्ये चर्चेत येतं. कारण इथे आयोजित ख्रिसमस इव्हेंट्समध्ये कपडे घालणं ऑप्शनल आहे. म्हणजे गेस्ट कपडे न घालताही येथील इव्हेंट्समध्ये सहभागी होऊ शकतात. हा एक अनोखा आणि साहसी अनुभव असून न्युडिज्मला प्रोत्साहन देतो. नॅचरल लाइफस्टाईल फॉलो करणाऱ्या लोकांमध्ये हा इव्हेंट खूप लोकप्रिय आहे.

क्लोवर स्पा अॅन्ड हॉटेलचे मालक टिम हिग्सना आपल्या हॉटेलवर गर्व आहे आणि ते गेस्टना कपडे न घालण्यासाटी प्रोत्साहित करतात. त्यांचं मत आहे की, न्युडिज्म तणाव आणि चिंता दूर करतं. सोबतच गेस्टना पाऊस, हवा आणि उन्हाच्या संपर्कात येण्याचा अनुभव मिळतो, ज्यामुळे त्यांची मानसिक शांतात वाढते.

टिम म्हणाले की, "इथे एक मैत्रिपूर्ण, कुणालाही जज न करण्यात येणारं वातावरण असतं. लोक कपडे न घालता इथे आनंद मिळवतात. कोणत्याही लैंगिक क्रिया इथे केल्या जात नाही". नॅचुरिस्ट समाजातील लोकांसाठी हे हॉटेल एक मोठं आकर्षण ठरत आहे.

हॉटेलमध्ये डिसेंबर महिन्यात चार मोठे इव्हेंट्स झाले आहेत आणि एक शानदार न्यू ईअर पार्टी ३१ डिसेंबरला आयोजित केली जाईल. या इव्हेंट्समध्ये कोणत्याही वयाचे लोक सहभागी होऊ शकतात. ही पार्टी दिवसभर चालेल आणि यात जेवण, ड्रिंक्स, म्युझिक, खेळ आणि मस्ती असेल.

त्याशिवाय हॉटेलमध्ये ४० पेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. हॉटेलमधील सेवा जसे की, स्पा, डान्स, म्युझिक आणि खाण्या-पिण्याच्या गोष्टी या इव्हेंट्समध्ये उपलब्ध करून दिल्या जातात.

इंटरनॅशनल पोलिंग फर्म Ipsos नुसार, न्युडिज्मच्या लोकप्रियतेत सतत वाढ होत आहे. आता १४ टक्के लोक स्वत:ला नॅचुरिस्ट किंवा न्युडीस्टच्या रूपात सादर करतात. जे जवळपास ६.७५ मिलियन लोक आहेत. ही वाढली लोकप्रियता बघता हॉटेल टिम आणि त्यांच्या टीमला आशा आहे की, पुढील वर्षी या इव्हेंट्समध्ये आणखी जास्त लोक सहभागी होतील.

टिम म्हणाले की, त्यांची न्यू ईअर पार्टी खूप लोकप्रिय आहे आणि या इव्हेंटसाठी दूरदुरून नॅचुरिस्ट लोक येतात. आमचं हॉटेल सामान्य लोकांसाठी वर्षभर सुरू असतं. फक्त ख्रिसमसमधील तीन दिवस बंद असतं. यात बरेच लोक मानसिक शांतता आणि आनंद मिळवण्यासाठी न्युडिज्मचा आनंद घेतात".