'या' गावात लग्नाआधी संबंध ठेवणं नाही गैर, वडिलच मुलीसाठी तयार करतात खास झोपडी आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 17:23 IST2025-03-25T16:36:17+5:302025-03-25T17:23:01+5:30
Interesting Facts : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एक ठिकाण असंही आहे जिथे लग्नाआधी संबंध ठेवणं चुकीचं मानलं जात नाही.

Interesting Facts : सामान्यपणे बऱ्याच देशांमध्ये लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं चुकीचं मानलं जातं. मात्र, बदलत्या काळानुसार, लोकांच्या विचारातही बदल होत आहेत. आजकाल लोक त्यांच्या मुलांच्या निर्णयांना प्राधान्य देतात. भारतात तर आजही असे काही ठिकाणं आहेत, जिथे मुलींना आवडता जोडीदार निवडणं तर दूरच पण मुलांकडे बघण्याचीही मुभा नसते. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एक ठिकाण असंही आहे जिथे लग्नाआधी संबंध ठेवणं चुकीचं मानलं जात नाही.
जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे रितीरिवाज आणि वेगवेगळ्या संस्कृती आहेत. काही ठिकाणी तर असे रिवाज असतात ज्यांचा आपल्याकडे कधी विचार केला गेला नसेल. कंबोडियातील एका अशाच रिवाजाबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कंबोडियातील कुन गावात आजही मुलीला हवा तसा जोडीदार निवडण्यासाठी तरूण मुलींना साधारण १० तरूणांसोबत संबंध ठेवण्याची परवानगी घरातील लोकांकडूनच मिळते.
इथे तरूणी वेगवेगळ्या पद्धतीनं तरूणांसोबत रात्र घालवतात. त्यांच्यासोबत वेळ घालवतात. यादरम्यान त्यांना वाटलं तर त्यांच्यासोबत संबंध ठेवतात. आश्चर्याची बाब म्हणजे तरूणी ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करतात ते घर मुलीच्या वडिलांकडूनच बांधलेलं असतं.
सामान्यपणे आपल्या देशात एक वडील आपल्या मुलीसाठी मुलगा शोधतात. पण कंबोडियाच्या कुन गावात फारच वेगळी प्रथा आहे. इथे वडील आपल्या मुलीसाठी एक 'लव्ह हट' नावाची झोपडी किंवा रूम तयार करतात. या 'लव्ह हट'मध्ये तरूणी त्यांच्या मित्रांसोबत संबंध ठेवतात. लव्ह हटमध्ये तरूणी केवळ रात्रीच राहतात. जोपर्यंत त्यांचा साखरपुडा होत नाही तोपर्यंत ते दिवसा सोबत राहू शकत नाहीत.
कंबोडियातील कुन गावात ही परंपरा खूप वर्षांपासून चालत आली आहे. यादरम्यान तरूणी साधारण ८ ते १० वेगवेगळ्या तरूणांना आमंत्रित करते. त्यांना भेटते, संबंध ठेवते. त्यानंतर त्यातील कुणाशी लग्न करायचं हे ती ठरवते.
या गावात राहणाऱ्या केउंग जमातीच्या लोकांचं मत आहे की, याप्रकारची प्रथा पाळून ते त्यांच्या समाजातील आणि परिवारातील महिलांना सशक्त बनवतात. इथे स्वत: वडील मुलींसाठी दुसऱ्या पुरूषांसोबत संबंध ठेवण्यासाठी झोपडी तयार करून देतात. येथील लोकांची अशीही मान्यता आहे की, अशाप्रकारे तरूणी त्यांच्यासाठी परफेक्ट पतीची निवड करू शकतात. हेच येथील तरूणींचं मत आहे.
एकीकडे अनेक देशांमध्ये लग्नाआधी संबंध ठेवणं चुकीचं मानलं जातं, तर कंबोडियातील कुन गावातील ही प्रथा फार खास आहे. त्यांच्यानुसार जोपर्यंत मुलगी तरूणांसोबत रात्र घालवत नाही, संबंध ठेवत नाही तोपर्यंत ती परफेक्ट जोडीदार निवडू शकत नाही. तसेच या प्रथेमुळे गावात घटस्फोट आणि लैंगिक अत्याचार अशा घटना खूप कमी घडतात, असं गावातील लोकांचं मत आहे.