शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मूर्ती लहान, पण...; बुटकेपणावरून समाजाने टोमणे मारले, मात्र कठोर मेहनतीने त्यांनी IAS बनून दाखवले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 10:32 AM

1 / 10
जाडेपणा असो किंवा कमी उंची किंवा आणखी काहीही शारीरिक कमतरता असेल तर अनेकांना टोमणे ऐकावेच लागतात. पण हीच लोकं त्यांच्यातील कमतरतेवर टोमणे मारणाऱ्यांना आपल्या कर्तुत्वातून सडेतोड उत्तर देत असतात.
2 / 10
अनेकदा असं बघायला मिळतं की, या लोकांची इच्छाशक्ती कमालीची मजबूत असते. अशीच मजबूत इच्छाशक्ती असणाऱ्या एका महिला IAS अधिकाऱ्याचा खडतर प्रवास आपण जाणून घेणार आहोत. त्यांनी मिळवलेलं यश आणि समाजासाठी केलेलं काम पाहून त्यांना मूर्ती लहान पण कीर्ती महान असंत म्हणावसं वाटेल.
3 / 10
या महिला IAS अधिकाऱ्यांच नाव आहे आरती डोगरा. आरती डोगरा या मूळ राजस्थानमधील. त्यांची उंची पाहून अनेकांनी त्यांच्या कार्यक्षमतेवर शंका घेतली होती. पण त्यांनी केलेल्या कामांमुळे त्या देशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये एक रोल मॉडल आहेत.
4 / 10
समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी, लोकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी त्यांनी अनेक चांगली कामे केली. ज्याचं कौतुक थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
5 / 10
उत्तराखंडमध्ये जन्म झालेल्या आरती यांना त्यांच्या आई-वडिलांनी भरपूर शिकवलं आणि आपल्या दिव्यांगावर मात करत पुढे जाण्यासाठी सतत मदत केली. आरतीचे वडिल राजेंद्र डोगरा भारतीय लष्करात कर्नल असून आई कुमकुम डोगरा सरकारी शाळेत मुख्यध्यपिका आहे. त्या सुद्धा भरपूर मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर IAS अधिकारी बनल्या. त्या 2006 च्या बॅचमधली IAS अधिकारी आहेत.
6 / 10
आरती यांची उंची ३ फूच ६ इंच इतकी असल्याने अर्थातच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांनी त्यांच्या कार्यक्षमतेवर शंका घेतली. अनेकांनी गंमत केली. पण त्या डगमगल्या नाहीत किंवा त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे कधी लक्ष दिलं नाही. त्यांनी लक्ष दिलं त्यांच्या अभ्यासावर.
7 / 10
देहरादूनमधील गर्ल्स स्कूलमधून त्यांनी आपलं शालेय शिक्षण घेऊन दिल्लीतील लेडी श्रीराम महाविद्यालयात पुढील शिक्षण पूर्ण करून त्यांनी IASची तयारी केली. इथेच त्यांनी शासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार तयारी सुरू केली.
8 / 10
पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्या पुन्हा देहरादूनकडे गेल्या. दरम्यान त्यांची भेट उत्तराखंडच्या पहिल्या महिला आयएएस आधिकारी मनिषा पवार यांच्यासोबत झाली. या भेटीनंतर आरतीने मनिषा यांना आपली प्रेरणा मानलं.
9 / 10
आरती डोगरा या सध्या बुंदी जिल्ह्याच्या जिल्ह्याधिकारी आणि आता अजमेरच्या जिल्हाधिकारी म्हणून त्या काम पाहात आहेत. ते म्हणतात ना इच्छाशक्ती, मेहनत आणि जिद्द असेल तर काहीही मिळवता येतं. आरती या त्याचंच एक मूर्तीमंत उदाहरण आहेत.
10 / 10
आरती या आपल्या दिव्यांगावर मात करून पुढे जाण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष न देता कसं पुढे जायचं हे त्यांनी आरती यांच्याकडे बघून शिकायला हवं.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीJara hatkeजरा हटकेupscकेंद्रीय लोकसेवा आयोगRajasthanराजस्थान