एकाच प्रजातीत दोघांचे गुण, पाहा Hybrid Animals!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 16:18 IST2019-10-02T16:12:55+5:302019-10-02T16:18:20+5:30

वेगवेगळ्या प्राण्यांचे संकर करून नवीन संकरित प्रजातीची निर्मिती जीवशास्त्रज्ञांनी केली आहे. अशाच काही प्रजातींबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.
लायगर : लायगर नावाचा संकरित प्राणी हा नर सिंह व मादी वाघ या प्राण्यांचा संकर घडवून तयार केला आहे. या प्राण्यात सिंह आणि वाघ यांचे गुण दिसतात. तोंड सिंहासारखे आणि शरीर वाघासारखे असते.
टायगॉन : टायगॉन हा संकरित प्राणी आहे. नर वाघ व मादी सिंह यांचा संकर घडवून तयार झालेला प्राणी आहे.
जग्लियन: जगलियन हा नर जग्वार आणि मादी सिंहाच्या संकरातून तयार झाला आहे.
कोयवॉल्फ : कोयवॉल्फ हा कोयोटेचा संकर आहे.
वोल्फिन : वोल्फिन मासा डॉल्फिन आणि व्हेल यांच्या संकरातून तयार झाला आहे.