किती श्रीमंत आहेत सौदी अरबचे किंग सलमान, आकडा वाचून उडेल झोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 14:58 IST2025-12-15T14:40:56+5:302025-12-15T14:58:42+5:30
Saudi Arebia King Net Worth : सौदी अरबच्या किंगने आपली संपत्तीची जगभरात गुंतवणूक केली आहे. ज्यातून त्यांना दरवर्षी एक फिक्स आणि मोठी रक्कम मिळते.

सौदी अरबचे किंग सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊ सऊदी अरब के किंग सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद त्यांच्या देशाचे राजा असण्यासोबतच मक्का-मदीनाचे संरक्षकही आहेत. ते पश्चिम आशियातील सगळ्यात प्रभावी नेत्यांपैकी एक आहेत.

त्यांच्या अनेक वर्षांच्या नेतृत्वाने सौदी अरबची राजधानी रियादला एका आधुनिक महानगरात बदललं. व्हिजन 2030 अंतर्गत अनेक सुधारणा केल्या आणि सौदी अरबला जगात एक महत्वाचं स्थान मिळवून दिलं.

किंग सलमान बिन अब्दुल अजीज जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची एकूण संपत्ती २० अरब डॉलर म्हणजेच जवळपास १.६८ लाख कोटी रूपये इतकी आहे.

त्यांना या संपत्तीचा मोठा भाग हाउस ऑफ सऊदच्या वरिष्ठ सदस्याच्या रूपात मिळाला आहे. सोबतच ते अनेक तेलांच्या विहिरीचे मालकही आहेत. ज्याद्वारे त्यांची मोठी कमाई होते.

सौदी अरबच्या किंगने आपली संपत्तीची जगभरात गुंतवणूक केली आहे. ज्यातून त्यांना दरवर्षी एक फिक्स आणि मोठी रक्कम मिळते.

किंग सलमान यांना तीन पत्नी आहेत आणि १३ अपत्ये आहेत. त्यातील २ मुले वारली. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान त्यांची तिसरी पत्नी फहदा बिन्त फलाह अल हिथलेनचा मुलगा आहे.
















