By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:15 IST
1 / 7Potato Birth History : बटाटे आपल्या जीवनाचा खूप महत्वाचा भाग आहेत. कारण भारतात जवळपास प्रत्येक घरामध्ये रोज किंवा एक दिवसआड बटाटे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने खाल्लेच जातात. बटाट्यांचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. पण अनेकांना हे माहीत नाही की, बटाट्यांचा जन्म कसा झाला आणि भारतात झालाच नाही. 2 / 7आज आम्ही आपल्याला बटाट्यांचा जन्म कुठे आणि कसा झाला हे सांगणार आहोत. सोबतच हेही सांगणार आहोत की, बटाट्याची 'आई' कोण आणि 'बाबा' कोण. हे सगळं वैज्ञानिकांनी केलेल्या एका रिसर्चच्या हवाल्याने आपण पाहणार आहोत. 3 / 7तर रिसर्चनुसार, आजपासून जवळपास ८० ते ९० लाख वर्षांआधी पृथ्वीवर एक अशी प्रजाती होती जी ना पूर्णपणे टोमॅटो होती ना पूर्णपणे बटाटा. वैज्ञानिकांना असं आढळून आलं की, जेव्हा या दोघांचं मिलन झालं तेव्हा बटाटा जन्माला आला. जेव्हा टोमॅटोच्या पूर्वजांनी एक जंगली बटाट्याची प्रजाती ज्याला एट्यूबरोसम म्हणतात, त्यासोबत मिलन केलं. हा एट्यूबरोसम मध्य चिलीमध्ये आढळतो. जेव्हा या दोन प्रजातींचं मिलन झालं, तेव्हा त्या जीनमधून एक नवीन झाड जन्माला आला, ज्याला आपण बटाटे म्हणतो. 4 / 7शेन्जेनच्या कृषि जीनोमिक्स संस्थेचे प्रोफेसर सानवेन हुआंग हे या रिसर्चचे मुख्य आहेत. ते सांगतात की, 'टोमॅटो बटाट्याची आई आहे आणि एट्यूबरोसम वडील!' पण हा एट्यूबरोसम आजच्या बटाट्यापेक्षा खूप वेगळा आहे. वरवर बघता दोन्ही एकसारखे दिसतात. एट्यूबरोसमच्या फांद्या पातळ असतात आणि त्यात बटाट्यासारखं स्टार्चने भरलेलं कंद नसतं. 5 / 7जेव्हा टोमॅटो आणि एट्यूबरोसमचं मिलन झालं, तेव्हा बटाट्यामध्ये काही खास गुण आलेत. बटाटा कोणत्याही वातावरणात उगवतो. याच्या कंदामध्ये पाणी आणि पोषक तत्व जमा होऊ शकत होते. हे टोमॅटो किंवा एट्यूबरोसममध्ये होत नव्हतं. याच कारणाने बटाटे जगभरात पसरले आणि इतके प्रसिद्ध झाले. बटाट्याची एक नवीनच प्रजाती जन्माला आली. 6 / 7रिसर्च दरम्यान टोमॅटो आणि बटाट्याच्या जीनचा खोलवर अभ्यास केला. त्यांना आढळलं की, टोमॅटो, बटाटे आणि एट्यूबरोसम एकाच ट्री फॅमिलीतील आहेत, ज्यात वांगी आणि तंबाखूचा देखील समावेश आहे. पण टोमॅटो आणि बटाट्याचे जीन फार मिळते-जुळते होते. 7 / 7या शोधातून हे समोर आलं की, दोन वेगवेगळ्या प्रजातीच्या मिलनातून काहीतरी अनोखं तयार होऊ शकतं. हा रिसर्च ३१ जुलै २०२५ ला सेल नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला होता.