धावत्या रेल्वेत इमरजन्सीमध्ये डॉक्टरला बोलवता येऊ शकतं का? अनेकांना माहीत नसते रेल्वेची 'ही' सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 15:48 IST2026-04-01T15:28:44+5:302026-04-01T15:48:46+5:30
Railway Emergency Medical Service : सुसाट धावणाऱ्या रेल्वेत एखाद्या इमरजन्सीमध्ये डॉक्टर कसा मिळणार? हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. अशात आज आपण जाणून घेणार आहोत की, रेल्वेत अचानक तब्येत बिघडली तर डॉक्टरांना कसं बोलवता येऊ शकतं?

Railway Emergency Medical Service : भारतात लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात. एका रिपोर्टनुसार, दिवसाला देशभरातील साधारण २.५ कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. प्रवास लांबचा असो की जवळचा रेल्वेचा प्रवास लोकांना आरामदायक, सुरक्षित आणि स्वस्त वाटतो. इतके लोक प्रवास करत असताना अचानक कुणाचीही तब्येत बिघडू शकते. कुणाला चक्कर येणे, उलटी येणे, ताप किंवा मग छातीत दुखणे अशा समस्या कुणालाही होऊ शकतात. पण सुसाट धावणाऱ्या रेल्वेत डॉक्टर कसा मिळणार? हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. अशात आज आपण जाणून घेणार आहोत की, रेल्वेत अचानक तब्येत बिघडली तर डॉक्टरांना कसं बोलवता येऊ शकतं?

धावत्या रेल्वेत डॉक्टर कसा मिळेल?
प्रवासात जर अचानक तब्येत बिघडली तर लोक घाबरतात. त्यांना प्रश्न पडतो की, धावत्या रेल्वेत मदत कशी मिळेल, डॉक्टर कुठून येईल? पण रेल्वेने नेहमीच प्रवास करणाऱ्यांना सुद्धा हे माहीत नसतं की, रेल्वेत मेडिकल इमरजन्सीसाठी खास व्यवस्था दिली जातात. सोप्या भाषेत समजून घेऊ की, धावत्या रेल्वेत डॉक्टर बोलवला जाऊ शकतं का आणि ही सुविधा कशी कामात येते.

काय कराल?
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, कोणत्याही प्रवाशाची तब्येत बिघडल्यास सगळ्यात पहिलं काम हे आहे की, टीटीईला याची माहिती द्या. टीटीईला जसे आपण सांगाल की, प्रवाशाची तब्येत बरी नाही. तर तो लगेच कंट्रोल रूमला संपर्क करेल आणि मेडिकल इमरजन्सीची माहिती देईल. त्यानंतर पुढील स्टेशनवर रेल्वेच्या मेडिकल टिमला अलर्ट केलं जातं आणि डॉक्टर प्लॅटफॉर्मवर रेल्वे येण्याची वाट बघत असतात.

कशी मिळते मेडिकल सर्व्हिस?
जशी रेल्वे स्टेशनवर थांबते, डॉक्टर लगेच रूग्णाला तपासतात. वेळ पडल्यास डॉक्टर रेल्वेत चढूनही रूग्णाला प्राथमिक उपचार देऊ शकतात. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ही सेवा पूर्णपणे मोफत नसते. रेल्वेकडून डॉक्टरला बोलवल्यास प्रवाशाने डॉक्टरला १०० रूपये फी द्यायची असते. जर डॉक्टर औषधं लिहून देत असेल किंवा जागेवर काही औषध देत असेल तर त्याचे पैसेही रूग्णाला वेगळे द्यावे लागतील.

मेडिकल किट असते
अनेकदा प्रवाशांना असं वाटतं की, कोणतीही समस्या असेल तर डॉक्टरला बोलवावं. पण जास्तीत जास्त सामान्य समस्यांसाठी रेल्वे आपल्या स्तरावर लगेच मोफत सेवा देते. जर एखाद्या प्रवाशाला हलका ताप, वेदना, उलटी किंवा अॅलर्जीसारख्या समस्या होतात, त्यांना टीटीई लगेच गार्डला संपर्क करतो. गार्डच्या डब्यात एक मेडिकल किट असते, ज्यात बेसिक औषधं ठेवलेली असतात. ही रूग्णाला दिली जातात.

हेल्पलाइन नंबर
जर टीटीई जवळपास नसेल आणि मदत हवी असेल तर रेल्वेकडून आणखी एक पर्याय देण्यात आलाय. तो म्हणजे हेल्पलाइन नंबर 139. हा नंबर 24 तास उपलब्ध असतो आणि मेडिकल सुविधा वेगाने पोहोचवण्याचं काम केलं जातं. आपण या नंबरवर कॉल केल्यावर पुढील स्टेशनवर डॉक्टर तयार राहतात. अशाप्रकारेही आपण रेल्वेत मेडिकल मदत मिळवू शकता.

रेल्वेनुसार, रेल्वेत मिळणाऱ्या वेद्यकीय सुविधेबाबत बऱ्याच लोकांनी माहितीच नसते. अर्ध्यापेक्षा जास्त प्रवाशांना हेच वाटतं की, धावत्या रेल्वेत डॉक्टर मिळणं शक्य नाही, पण सत्य हे आहे की, रेल्वेची इमरजन्सी मेडिकल सेवा खूप मजबूत आहे. गरज पडल्यास डॉक्टर रेल्वेत येऊनही रूग्णाची मदत करतो. फक्त आपल्याला प्रक्रिया माहिती असणं गरजेचं आहे. अशात पुढच्या वेळी जेव्हा रेल्वेने प्रवास करत असाल आणि कुणाची अचानक तब्येत बिघडली तर लगेच टीटीई किंवा हेल्पलाइनवर माहिती द्या.

















