सापांचं आयुष्य किती वर्षांचं असतं आणि सगळ्यात जास्त कोणता साप जगतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:57 IST2025-07-29T13:13:07+5:302025-07-29T14:57:54+5:30
Interesting Facts : साप किती वर्ष जगतात हे अनेकांना जाणून घ्यायचं असतं. तेच पाहुयात.

Interesting Facts : पहिला श्रावण सोमवार नुकताच झाला. सगळीकडे भक्तीमय वातावरण आहे. अशात सोशल मीडियावर यासंबंधी वेगवेगळ्या पोस्ट बघायला मिळत आहेत. सोशल मीडियावर अलिकडे सापांसंबंधी वेगवेगळे व्हिडीओ आणि माहिती पोस्ट केली जात आहे. बऱ्याच लोकांना सापांबाबत जाणून घेण्याची उत्सुकता देखील असते. सापांबाबतची अशीच एक बाब म्हणजे त्यांचं आयुष्य. साप किती वर्ष जगतात हे अनेकांना जाणून घ्यायचं असतं. तेच पाहुयात.
सापांच्या एक्सपर्ट एका व्यक्तीनं सांगितलं की, भारतात जवळपास २७० पेक्षा जास्त सापांच्या प्रजाती आढळतात. यातील काही साप आपल्या आजूबाजूला असतात. तर काही प्रजाती जंगलात राहतात. एका रिपोर्टनुसार मध्यप्रदेशच्या खरगोन भागात ४० प्रकारचे साप आढळतात.
एक्सपर्ट सांगतात की, सरासरी आयुष्य हे ५ ते १५ वर्षांचं असतं. पण हे त्यांची प्रजाती, वातावरण यावर अवलंबून असतं. रहिवाशी भागांमध्ये किंवा शेतांमध्ये राहणाऱ्या सापांचं आयुष्य ८ ते १० वर्ष असतं. कारण मनुष्यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांचं जीवन कमी होतं.
कॉमन करेट, कोब्रा, रसैल वायपर आणि सॉ-स्केल्ड वायपरसारखे भयानक साप १५ किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष जगतात. पण जेव्हा सगळ्यात जास्त जगण्याचा विषय येतो तेव्हा अजगराचं नाव सगळ्यात वर येतं.
अजगर सगळ्यात जास्त जगतात. याचं कारण ते विषारी नसतात. पण त्यांची पकड इतकी मजबूत असते की, मनुष्य असो वा एखादा मोठा प्राणी त्याला अजगर वेढा देऊन मारू शकतो. अजगर साधारणपणे २५ ते ४० वर्ष जगू शकतात.
तसं तर सापाचं नेमकं नेमकं आयुष्य सांगणं अवघड असतं. पण एक्सपर्ट सापाचा आकार, त्वचेची चमक आणि त्यांच्या लांबीवरून त्यांच्या वयाचा अंदाज लावतात. जशी मनुष्यांची एका वयानंतर लांबी वाढणं बंद होतं, तसंच सापांसोबतही होतं. साप वेळोवेळी आपली कात बदलत असतात, ज्यावरून त्यांच्या वयाच्या अंदाज लावला जाऊ शकतो.