अवैध मसाज पार्लवर पोलिसांनी मारला छापा; अन् कमिश्नरला रंगेहात पडकडलं, मग घडलं असं काही....

Published: May 13, 2021 07:31 PM2021-05-13T19:31:44+5:302021-05-13T19:56:46+5:30

Police caught their own chief after raiding an illegal massage parlour : पोलिसांनी एका मुख्य अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाहिलं आणि सगळे आश्चर्यचकित झाले.

हॉन्गकॉन्ग पोलिसांनी अलिकडेच एका अवैध मसाज पार्लरवर छापा मारला आहे. पण तिथं पोहोचल्यानंतर असं काही होईल याची कल्पनाही केली नव्हती.

हे मसाज पार्लर कोणत्याही लायसेंसशिवाय सुरू होतं. जेव्हा या ठिकाणी पोलिस पोहोचले तेव्हा अनपेक्षित प्रकार घडला. पोलिसांनी एका मुख्य अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाहिलं आणि सगळे आश्चर्यचकित झाले.

या ऑफिसरचे नाव फ्रेडरिक चोई चिन पेंग असे आहे. ही व्यक्ती सिनियर असिस्टेंट कमिश्नर या पदावर कार्यरत आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं दिलेल्या माहितीनुसार छापेमारीत पकडल्यानंतर त्यांना सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे.

या घटनेनंतर हॉन्गकॉन्ग पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेल्याचं सांगितलं जात आहे. २०१९ मध्ये हॉन्गकॉन्ग पोलिसांना टिकेचा सामना कराव लागला होता.

या प्रकरणात हॉन्गकॉन्ग पोलिसांचे प्रमुख टँग फ्रेडरिक यांना अटक केली जाणार आहे.

फ्रेंडरिक हे हॉन्गकॉन्ग पोलिसमधील सगळ्यात वरिष्ठ अधिकारी होते

फ्रेडरिक यांनी १९९५ मध्ये पोलिस फोर्स जॉईन केले होते. चीन, यूके, कनाडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशा देशांमध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतली होती.

Read in English