डोळे विस्फारतील! पांढऱ्या वटवाघळांना पाहून लोक म्हणाले, हे तर कापसाचे गोळे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 15:29 IST2020-07-01T15:03:11+5:302020-07-01T15:29:25+5:30
पण या पांढऱ्या वटवाघळांना पाहून तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही. कारण ही वटवाघळांची पिल्लं पांढऱ्या कापसाच्या गोळ्यासारखी दिसत आहेत.

एका रेनफॉरेस्ट स्पेशालिस्टनं इन्स्टाग्रामवर एक पांढऱ्या वटवाघळांचा व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे सामान्यांच्या मनात वटवाघळांबद्दल भीती आहे.
पण या पांढऱ्या वटवाघळांना पाहून तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही. कारण ही वटवाघळांची पिल्लं पांढऱ्या कापसाच्या गोळ्यासारखी दिसत आहेत.
एकानं कोस्टा रिकाच्या जंगलात या पांढऱ्या वटवाघळांचे फोटो टिपले आहेत. या पांढऱ्या वटवाघळांना होंडुरन व्हाइट बॅट म्हटलं जातं. जे होंडुरास निकारागुआ आणि पनामामध्येही आढळतात.
इन्स्टाग्रामवर supreet_sahoo यानं हा व्हिडीओ शेअर केला. आहे. त्यानं स्वतःला रेनफॉरेस्ट स्पेशालिस्ट असल्याचं सांगितलं आहे. त्याला एक लाखांहून जास्त लोक फॉलो करतात.
यांच्या पेजवर विविध पक्ष्यांची जबरदस्त फोटो आणि व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत या व्हिडीओला १३ हजार व्ह्यूज मिळाले आहेत.
या छोट्या वटवाघळांना कॅरेबियन व्हाइट टेंट-मेकिंग बॅट या कॉटन बॉल बॅट्स म्हटलं जातं. फोटो पाहायला मिळणाऱ्या या वटवाघळांची वाढ एवढीच असते.
नर हे मादीपेक्षा जास्त आकाराने मोठे असतात. ही वटवाघळं हेलिकोनिया झाडांच्या पानांमध्ये राहतात. त्यांना टेंट मेकिंग बॅटही म्हटलं जातं.
ही वटवाघळं शाकाहारी असतात. झाडांच्या पानांमध्येही राहायला यांना आवडतं.
एका पानाच्या खाली सहा ते सात समूहानं वटवाघळं राहतात.
या दुर्लक्ष प्रजातीच्या वटवाघळांना वाचवण्याची गरज प्राणीमित्रांनी व्यक्त केली आहे.