शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' मुस्लिमबहुल देशात तयार होतंय विशाल मंदिर; २०२२ पासून भक्तांना दर्शन घेता येणार, पाहा फोटो

By manali.bagul | Published: January 26, 2021 3:33 PM

1 / 7
दुबईमध्ये वाढणारी हिंदू लोकसंख्या पाहता या ठिकाणी एक भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार २०२२ पर्यंत हे मंदिर भाविकांसाठी दर्शनाला खुले करण्यात येणार आहे. युएईमध्ये जवळपास ३० लाख भारतीय राहतात. त्यांची आस्था लक्षात घेता मंदिर तयार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
2 / 7
२०१५ मध्ये जेव्हा पंतप्रधान आबू धाबीला गेले होते तेव्हा मंदिरासाठी जमिन मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. दुबईतल्या एका शहरातील जेबेल अली परिसरात गुरू नानक सिंह दरबाराजवळ या मंदिराचे निर्माण होत आहे. ज्याचा समावेश सगळ्यात जुन्या गुरूद्वारामध्ये होतो. याची स्थापना १९५० मध्ये करण्यात आली होती.
3 / 7
रविवारी गल्फ न्यूजशी बोलताना मंदिराचे ट्रस्टी राजू श्रॉफ यांनी सांगितले की, ''हे मंदीर युएई आणि दुबईच्या नेत्यांच्या विचारांमधील खुलेपणा दर्शवते. ''
4 / 7
या मंदिरात ११ देवी देवतांची स्थापना केली जाणार आहे. २५००० स्क्वेअर फुटात याची निर्मीती होणार आहे. पारंपारिक वास्तुकलेच्या उदाहरणांचा वापर या मंदिराच्या निर्मितीसाठी केला जाणार आहे.
5 / 7
हे संपूर्ण मंदिर ७५००० स्क्वेअर फुट परिसरात पसरलेले आहे. या मंदिरात दोन बेसमेंट आणि ४०० स्क्वेअर फूटचा एक भव्य हॉलसुद्धा असणार आहे.
6 / 7
ज्या ठिकाणी ७७५ लोक एकत्र जमा होऊ शकतात. याशिवाय १०० स्क्वेअर फूटांचा हॉल असणार आहे. ज्यात जवळपास १०० लोक एकत्र होऊ शकतील.
7 / 7
असं म्हटलं जात आहे की हे मंदिर २०२२ च्या दिवाळीपर्यंत तयार होऊ शकेल. दिवाळीनंतर भक्तांना दर्शनासाठी खुलं करण्यात येईल. (Image Credit-buisness today, we the world magazine, en.everybodywiki.com/)
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलTempleमंदिरtempleमंदिरDubaiदुबई