'या' आहेत जगातील सगळ्यात उंचच उंच मूर्ती; मूर्तींंकडे पाहताना मान दुखल्याशिवाय राहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 06:05 PM2021-01-05T18:05:28+5:302021-01-05T19:10:26+5:30

जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या उंचच उंच वैशिष्ट्यपूर्ण मुर्तींबाबत प्रत्येकाच्या मनात नेहमीच आकर्षण असतं. आज आम्ही तुम्हाला जगभरातील उंच मूर्ती आणि पुतळ्यांबद्दल सांगणार आहे. केरळमध्ये अजिमलामध्ये या मुर्तीची स्थापना करण्यात आली होती. देवदाथन या गृहस्थानं वयाच्या २२ व्या वर्षी या मुर्तीची स्थापना करायचं ठरवलं. ही मुर्ती समुद्र किनारी तयार करण्यात आली होती.

सम्राट यान आणि हुआंग: ही मूर्ती तयार करण्याचे काम १९८७ मध्ये सुरू करण्यात आले होते. २० वर्षांनी या मूर्तीचे काम पूर्ण झाले आहे. हेनान प्रातांत ही मूर्ती असून या मुर्तीचे डोळे ३ मीटर पसरलेले आहेत. नाक ६ मीटरचे आहे.

गुयान यिन: चीनच्या हेनान प्रातांतील ही अनोखी मूर्ती आहे. जगातील सगळ्यात मोठ्या प्रतिमांमध्ये या मुर्तीचा समावेश होतो. ही मूर्ती तयार करण्यासाठी ६ वर्षाचा कालावधी लागला होता.

उशिकु दाईबुत्सू: ही मूर्ती जपानच्या उशिकु शहरात आहे. ही मूर्ती काश्यापासून तयार झाली आहे. या मुर्तीवर चढण्यासाठी एलिव्हेटर लावण्यात आले आहेत. ही मूर्ती पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येतात.

म्यानमार, लायकून सेटकियर: या स्टॅच्यूच्या निर्माणाचे काम १९९६ ते २००८ पर्यंत सुरू होते. ही मूर्ती १३.५ उंच सिंहासनावर उभी आहे. मूर्ती उंचावरून पाहण्यासाठी लिफ्ट लावण्यात आली आहे.

स्प्रिंग टेम्पल बुध्दा: याची सुद्धा जगातील सगळ्यात मोठ्या मूर्तींमध्ये गणती होते. याच्या निर्मितीचे काम १९९७ पासून सुरू झाले असून २००८ मध्ये हे काम पूर्ण झाले. ही मूर्ती २० मीटर लांब कमळाच्या फुलावर उभी आहे. यात तांब्याच्या ११०० तुकड्यांचा समावेश आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटी : भारतातील हा पुतळा सगळ्यात मोठा मानला जातो. या पुतळ्याचे वजन १७०० टन असून मुर्तीच्या पायांची उंची ८० फूट आहे. सरदार पटेल यांचा पुतळा नर्मदा नदी परिसरात स्थापन करण्यात आला आहे. न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा याची उंची दुप्पट आहे.

ग्रेट बुध्दा: थायलँडमध्ये ही सगळ्यात मोठी मुर्ती असून १९९० ते २००८ पर्यंत ही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते. ही मुर्ती सिमेंट आणि काँक्रीटपासून तयार झाली आहे. या मूर्तीवर सोन्याचा रंग चढवला आहे.

पीटर द ग्रेट स्टॅच्यू: हा पुतळा रशियातील मॉस्को शहरातील मोजकेवा नदीजवळ आहे. पीटर रुसच्या महान सम्राटांपैकी एक होते. याचे वजन १०० टन असून १९९७ मध्ये हा पुतळा तयार झाला होता.

सेंडाई डायकानन: जपानमधील ही मूर्ती बौध्द बोधिसत्वाचे प्रतिनिधित्व करते. ही मुर्ती पर्वतांवर आहे. या मूर्तीवर जाण्यासाठीही लिफ्ट लावण्यात आली आहे.