शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

#HappyBirthdayHrithikRoshan : सुझेनने ह्रितिकला वाढदिवसाच्या अशा दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 2:42 PM

1 / 5
बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशन आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करतोय. निळे डोळे आणि डान्स स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या हृतिकचा जन्म १९७४ रोजी मुंबईत झाला होता. २००० मध्ये बॉलिवूड करिअरची सुरुवात करणा-या हृतिकने याच वर्षात त्याची गर्लफ्रेन्ड सुजॅन खानसोबत लग्न केले होते.
2 / 5
पण १४ वर्षानंतर हृतिक व सुजॅन कायदेशीररित्या विभक्त झाले. अर्थात घटस्फोटानंतरही दोघांमधलं नातं छान आहे. सुजॅनने आपल्या एक्स-हसबंडला इन्स्टाग्रामवरुन बर्थ डे विश केलं आहे.
3 / 5
या फोटो आणि पोस्टवरून तरी हेच सिद्ध होतेय की दोघं अजूनही चांगले मित्र आहेत. या फोटोतही दोघांची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. ‘तू कायम...कायम माझ्या आयुष्यातील प्रकाश बनून राहशील. वाढदिवसाच्या शुभेच्छा...’, असे सुजॅनने एक्स हसबण्ड हृतिकसाठी लिहिले आहे.
4 / 5
ह्रतिक रोशन व सुजॅन खान या दोघांचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला असला तरी दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. हृतिकच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमात सुजॅन आवर्जून हजेरी लावली. दोघेही मुलांसोबत हॉली डे एन्जॉय करतात
5 / 5
सुजॅन हृतिकच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहत आलीय आणि ह्रतिकही कायम तिला सपोर्ट करत आलाय. अलीकडे हृतिक व कंगना राणौत या दोघांच्या वादातही सुजैने हृतिकला खंबीर पाठींबा देताना दिसली होती. घटस्फोटादरम्यानही त्याने कधीच वाईट शब्दांत वगैरे तिच्यावर आरोप केले नाहीत.
टॅग्स :Hrithik Roshanहृतिक रोशनbollywoodबॉलीवूड