By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:04 IST
1 / 13Funny Station Names : भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाईन म्हटलं जातं. भारतीय रेल्वे जगातील सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. भारतीय रेल्वेसंबंधी अनेक किस्से आणि कहाण्या आहेत, ज्या आपल्याला नेहमीच अवाक् करतात. रेल्वेच्या वेगवेगळ्या अजब गोष्टी आम्ही आपल्याला सांगत असतो, आज आम्ही आपल्याला रेल्वेच्या मजेदार आणि अजब नावांबाबत सांगणार आहोत. यातली काही नावं वाचून आपल्याला नक्कीच हसू फुटेल. 2 / 13रेल्वे स्टेशनच्या फनी नावांबाबत सांगायचं तर देशात 'दारू' नावाचं एक स्टेशन आहे. दारू हे झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील एक गाव आहे. येथील स्थानिक स्टेशनचं नाव गावाच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. 3 / 13'बाप' नाव ऐकून तर आपल्याला हेच वाटलं असेल की, हे स्टेशन सगळ्या स्टेशनचा बाप असेल, पण असं नाहीये. कारण इथे सुपरफास्ट गाड्या थांबत नाहीत. हे स्टेशन राजस्थानच्या जोधपूरमध्ये आहे. 4 / 13'साली' हे नाव वाचल्यावर तर असं वाटतं की, जीजा नावाचंही एक स्टेशन हवं होतं. म्हणजे जोडी मस्त जमली असती. साली नावाचं हे स्टेशन जोधपूर जिल्ह्यातील डूडू नावाच्या ठिकाणी आहे. 5 / 13'सिंगापूर रोड' हे नाव वाचल्यावर आपल्याला वाटेल की, इथूनच सिंगापूरला जाता येतं की काय. पण असं काही नाहीये. सिंगापूर रोड रेल्वे स्टेशन ओडिशामध्ये आहे. 6 / 13ही तर फारच कमाल झाली. इथे राहणाऱ्या लोकांची नेहमीच 'पनौती' नावावरून गंमत केली जाते. पनौती हे स्टेशन उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातील एक छोटं गाव आहे.7 / 13खतरनाक...हे नाव वाचून नक्कीच आपण लोटपोट होऊन हसाल. 'टट्टीखाना' अशा नावाचं स्टेशन तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात आहे. हे एक छोटं गाव आहे, ज्यात ११० च्या आसपास लोक राहतात. 8 / 13'दीवाना' नावाचं हे रेल्वे स्टेशन हरयाणाच्या पानीपतजवळ आहे. येथील दोन प्लॅटफॉर्मवर रोज साधारण १६ रेल्वे थांबतात. 9 / 13झारखंडमध्ये हे 'भागा' नावाचं रेल्वे स्टेशन आहे. इथे जर कधी आलात आणि ट्रेन सुटत असेल नक्कीच धावावं लागेल. 10 / 13'सहेली' नावाचं हे स्टेशन मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि इटारसीच्या जवळ आहे. हे स्टेशन मध्य रेल्वेच्या नागपूर डिव्हिजनमध्ये येतं. 11 / 13'काला बकरा' हे नाव कशावरून पडलं असेल प्रश्नच आहे. हे स्टेशन जालंधरमध्ये येतं. 12 / 13'कुट्टा' हे कर्नाटक राज्यातील एक छोटं गाव आहे. या ठिकाणाचं नैसर्गिक सौंदर्य आणि वन्य जीवन फारत सुंदर आहे. 13 / 13'भैसा' नावाचं एक छोटं रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनहून जास्त रेल्वे धावत नाहीत. या स्टेशनला तेलंगणाच्या निर्णल जिल्ह्यातील भैंसा शहराच्या नावावरून नाव देण्यात आलं आहे.