By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:50 IST
1 / 7Free Food Railway : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांची कमी नाही. लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करत आपल्या ठिकाणावर पोहोचतात. रेल्वेने प्रवास केला नाही असा भारतात क्वचितच कुणी सापडेल. रेल्वेचा प्रवास हा खूप वेगळे अनुभव देणारा, आरामदायक आणि स्वस्त असतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोक हाच पर्याय निवडतात. आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेलच. प्रवास करताना जेवणासाठी आपण घरून डबा आणला असेल किंवा मग रेल्वेतून जेवण किंवा पाणी खरेदी केलं असेल.2 / 7रेल्वेत पैसे दिल्याशिवाय काहीच मिळत नाही. म्हणजे रेल्वेत फ्रीमध्ये जेवण मिळत नाही. पण आपल्याला कदाचित माहीत नसेल की, देशात एक रेल्वे अशीही ज्यात नाश्ता आणि जेवण फ्री मिळतं. बसला ना धक्का...पण हे सत्य आहे. देशात एक फ्री जेवण देणारी एक रेल्वे धावते. चला पाहुयात कोणतीही आहे ही रेल्वे आणि कुठून कुठपर्यंत धावते. 3 / 7फ्री जेवण मिळणाऱ्या रेल्वेचं नाव आहे सचखंड एक्सप्रेस. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, या रेल्वेत गेल्या तीन दशकांपासून लंगरची सेवा दिली जाते. सचखंड एक्सप्रेसचा नंबर १२७१५ असून ही रेल्वे पंजाबच्या अमृतसर ते महाराष्ट्रातील नांदेडपर्यंत आणि नांदेड ते अमृतसरपर्यंत धावते. ही रेल्वे साधारण २ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. 4 / 7मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचखंड एक्सप्रेस प्रवासादरम्यान एकूण ३९ स्टेशन्सवर थांबते. ज्यातील ६ स्टेशनवर प्रवाशांसाठी लंगर लावलं जातं. इथे कोणत्याही भेदभावाशिवाय जेवण दिलं जातं. सगळ्यांनाच कढी - भात किंवा खिचडी, भाजी - चपातीही खायला मिळते. 5 / 7रेल्वेच्या मार्गात येणाऱ्या ६ स्टेशनवर प्रवाशांसाठी ताजं जेवण तयार करून आणलं जातं. हे जेवण कुणाच्या घरातून, गुरूद्वारातून बनवून आणलं जातं. रेल्वेच्या मार्गात येणारे गुरूद्वारे दान, धान्य आणि सेवेच्या माध्यमातून लंगर लावतात. प्रवाशी सुद्धा या सेवेत सहभागी होतात. रेल्वेच्या मार्गात येणाऱ्या संभाजीनगर, झांसी, ग्वालिअर, दिल्ली आणि लुधियाना या स्टेशनवर प्रवाशांना हे जेवण मिळतं.6 / 7बरेच लोक आपल्यासोबत भांडी सुद्धा आणतात. इतकंच नाही तर धान्य आणि सेवेच्या माध्यमातूनही प्रवासी योगदान देतात. प्रवाशांसाठी जेवणाची ही व्यवस्था गेल्या २९ वर्षांपासून वेगवेगळ्या मार्गातील वेगवेगळ्या गुरूद्वारांकडून केली जाते. ही सेवा भारतीय रेल्वेची नाही. फक्त प्रवाशांनी आपली भांडी आणणं अपेक्षित असतं. 7 / 7सचखंड एक्सप्रेस १९९५ मध्ये आठवड्यातून केवळ एकदाच चालवली जात होती. नंतर आठवड्यातून दोनदा चालण्याचा निर्णय घेण्यात आला. १९९७ - ९८ दरम्यान ही रेल्वे आठवड्यातून दोनदा चालवली जाऊ लागली. नंतर २००७ पासून ही रेल्वे आठवड्यातील प्रत्येक दिवस चालवली जाते. या रेल्वेचा प्रवास हा २०८१ किलोमीटर आणि ३८ तासांचा असतो.