हवेत आलिशान रिसॉर्ट बांधणार दुबई, ४७ अब्ज रूपये येणार खर्च; बघा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:39 IST2025-02-06T13:27:39+5:302025-02-06T13:39:41+5:30

World tallest resort : दुबईत आता हवेत एक रिसॉर्ट बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. इथे लवकरच जबील पार्कमध्ये 'थर्मे दुबई' नावाचं जगातील सगळ्यात उंच वेल-बीईंग रिसॉर्टचं बांधकाम सुरू होईल.

World tallest resort : दुबई शहर शानदार लाइफस्टाईल आणि उंच इमारतींसाठी ओखळलं जातं. इथे जगातील सगळ्यात उंच इमारत बुर्ज खलिफासोबत अनेक सुंदर इमारती आणि रिसॉर्ट आहेत. आता दुबईत पुन्हा एक नवीन रिसॉर्ट बांधलं जात आहे. जे हवेत असेल. (फोटो - X/@DXBMediaOffice)

दुबईत आता हवेत एक रिसॉर्ट बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. इथे लवकरच जबील पार्कमध्ये 'थर्मे दुबई' नावाचं जगातील सगळ्यात उंच वेल-बीईंग रिसॉर्टचं बांधकाम सुरू होईल. हे रिसॉर्ट आर्किटेक्चरचा एक अद्भुत नमुना असेल. हे भव्य रिसॉर्ट १०० मीटर उंचीवर बनवलं जाणार आहे.

या रिसॉर्टचा एक थ्रीडी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यात या रिसॉर्टची झलक दाखवण्यात आली. हे रिसॉर्ट २०२८ मध्ये सुरू होणार आहे.

दुबईचा क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूमनं हवेत बांधल्या जाणाऱ्या या रिसॉर्टची घोषणा केली. हे रिसॉर्ट ५०० हजार वर्ग फूट जागेत बांधलं जाणार आहे.

क्राउन प्रिन्सनं सांगितलं की, हा इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट शहरी बायो डायव्हर्सिटी, पर्यावरणीय स्थिरता वाढवणं, दुबईतील लोकांना आणि पर्यटकांना एक वेगळा अनुभव देणारा ठरेल.

खलीज टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सरकारनं नवीन लॅंडमार्कच्या विकासासाठी २ बिलियन दिरहम (४७ अब्ज रूपये) देण्यात आले आहेत. या रिसॉर्टमध्ये एक इंटरॅक्टिव पार्क आणि जगातील सगळ्यात मोठं बॉटनिकल गार्डनही असेल.

या रिसॉर्टची योजना दुबई क्वालिटी ऑफ स्ट्रॅटेजी २०३३ नुसार बनवली जात आहे. याचा उद्देश दुबईला राहण्यासाठी जगातील सगळ्यात चांगलं शहर बनवणं आहे. या योजने अंतर्गत २०० पार्क, समुद्र किनारी सायकलिंग ट्रॅक, रात्री स्वीमिंग अशा सुविधा दिल्या जाणार आहे.

योजनेनुसार, प्रत्येक रेसिडेन्शिअल कम्युनिटी लॅंडस्केप आणि विशिष्ट आर्किटेक्चर प्रवेश द्वारही असतील. ३ हजारांपेक्षा जास्त झाडं लावली जातील.