शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

नशेत असताना महिलेकडून झाली अशी चूक, आता पश्चाताप करत जगणं भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 17:28 IST

1 / 7
चांगले मित्र हे नेहमीच आनंदात आणि दु:खात आपल्या मित्रांची साथ देत असतात. कठिण काळात मित्राचं महत्व अधिक वाढतं. पण अशा मित्रांना दगा देणं कुणासाठीही अडचणीचं ठरू शकतं. एका महिलेने नशेत असताना आपल्याच मैत्रिणीला दगा दिला. ज्यासाठी कदाचित ती तिला कधीच माफ करणार नाही.
2 / 7
'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, महिलेने स्वत: शेअर करत आपल्या कारनाम्याबाबत दु:खं व्यक्त केलं. ती म्हणाली की, माझी मैत्रीण जीवनाच्या प्रत्येक चढ-उतारात तिच्यासोबत राहिली. पण मी तिच्या पतीसोबत संबंध ठेवून तिला दगा दिला. हे सगळं नशेत झालं. ज्याचा मला फारच पश्चाताप होत आहे.
3 / 7
महिलेने सांगितलं की, विश्वास ठेवणं कठिण आहे. पण माझ्या मूर्खपणामुळे असं झालं आहे. ती पुढे म्हणाली की, १० वर्षाआधी मी माझ्या पार्टनरला सोडलं होतं. कारण तो माझ्यावर हक्का गाजवत होता आणि माझ्यासोबत वाईट वागत होता. यादरम्यान माझी मैत्रीण माझ्यासोबत होती. तिच्या मदतीमुळे मी वाईट काळातून बाहेर आली. या महिलेचं वय ३७ वर्ष आहे.
4 / 7
त्या रात्रीची घटना आठवत महिलेनं सांगितलं की, आम्ही सगळेजण माझ्या बेस्ट फ्रेन्डच्या घरी एक पार्टीसाठी जमा झालो होतो. कारण त्या दिवशी एका दुसऱ्या मैत्रिणीचा साखरपुडा होता. ती रात्र फारच मोठी होती आणि ड्रिंक्सनंतर सगळेजण झोपायला गेले. पण मी आणि माझ्या मैत्रिणीचा पती एकटे राहिलो होतो.
5 / 7
महिलेने सांगितलं की, मैत्रिणीचं वयही ३७ आहे. तर तिच्या पतीचं वय ३८ आहे. त्या रात्री आम्ही दोघे बसून एकापाठी एक पेग पित होतो. पण तेव्हाच अचानक मैत्रिणीच्या पतीने माझा हात पकडून मला त्याच्याजवळ खेचलं. मग त्याने मला किस केलं. ज्यामुळे मी फार हैराण झाले होते. पण त्याचं प्रेम मी फील करू शकत होते.
6 / 7
महिलेनं सांगितलं की, नंतर तो मला वरच्या रूममध्ये घेऊन गेला. तिथे आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात हरवलो होतो. ते फीलिंग फार चांगलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी वादळ आलं होतं. महिला म्हणाली की, जेव्हा मी झोपेतून उठली तर मला आजारी असल्यासारखं जावणत होतं. त्याचं कारण होतं मला माझ्या मैत्रिणीसाठी वाईट वाटणं.
7 / 7
आता महिलेला या गोष्टीची चिंता सतावत आहे की, जर याबाबत तिच्या बेस्ट फ्रेन्डला समजेल तेव्हा तिला काय वाटेल? महिलेनं सांगितलं की, त्या रात्रीनंतर मी तिच्या पतीसोबत बोलले सुद्धा नाही आणि आम्हा दोघांनाही हे समजून चुकलं आहे की, ती एक चूक होती. मी याबाबत कुणालाही सांगितलं नाही. पण मला भीती आहे की, ही घटना समोर येऊ नये. या घटनेपासून माझं कोणत्याही कामात लक्ष लागत नाहीये.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटकेWomenमहिला