एका स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने केद्याने खोदली १०० फुटाची सुरंग, 'या' सिनेमातून घेतली होती आयडिया!

By अमित इंगोले | Published: September 28, 2020 11:28 AM2020-09-28T11:28:53+5:302020-09-28T11:40:29+5:30

या कैद्याने त्याच्या बॅरेकमधून एक सुरंग खोदली होती. ही सुरंग त्याने केवळ एका स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने खोदली. ही सुरंग खोदण्याची आयडिया त्याने एका सिनेमातून घेतल्याचे समजते.

गुन्हेगारांचं डोकं हे इतरांपेक्षा वेगळं आणि अधिक चतुर असतं हे आपणा सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे ज्या गोष्टींचा विचार सामान्य लोक करतही नाही तसे गुन्हे हे लोक करतात. मोठ्या मुश्कीलीने पकडून यांना तुरूंगात डांबण्यात येतं. पण असेही अनेक गुन्हेगार आहेत जे संधी मिळताच तुरूंग फोडून पसार होतात. नुकतीच चीनमध्ये अशीच एक घटना घडली. येथील एका तुरूंगातून एक कुख्यात ड्रग डीलर पळून गेला. त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या कैद्याने त्याच्या बॅरेकमधून एक सुरंग खोदली होती. ही सुरंग त्याने केवळ एका स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने खोदली. ही सुरंग खोदण्याची आयडिया त्याने एका सिनेमातून घेतल्याचे समजते.

चीनच्या जकार्तामधील ही घटना आहे. इथे तुरूंगात कैद असलेल्या चीनी ड्रग डीलरने १०० फूट सुरंग खोदून तुरूंगातून पलायन केलं.

या गुन्हेगाराचं नाव चंगपन असं असल्याचं समजतं. त्याला २०१७ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला ११० किलो ड्रग्ससोबत पकडण्यात आले होते. पण आता तो फरार झालाय.

तो पळून गेल्यावर पोलिसांना त्याच्या बॅरेकमध्ये एक स्क्रूड्रायव्हर सापडला. याच्या मदतीने त्याने सुरंग खोदली. हा स्क्रूड्रायव्हरने त्याने तुरूंगातील किचनमधून चोरी केला होता.

ड्रग डीलरने स्क्रूड्रायव्हरने ५० सेंटीमीटर आकाराचा एक रस्ता तयार केला आणि त्यातून तो तुरूंगातून फरार झाला. तो पळून जात असताना तुरूंगाच्या सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झालाय. ज्यात तो आरामात पळून जाताना दिसतोय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कैदी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ही सुरंग बनवत असेल. ड्रग डीलरचं वय ५३ वर्षे आहे. या वयातही त्याने ही सुरंग खोदली हे पाहून पोलिसही हैराण झालेत.

या ड्रग्स डीलरची पळून जाण्याची पद्धत The Shawshank Redemption नावाच्या सिनेमासारखी आहे. या सिनेमातही काही कैदी पळून जात असतात. काय चंगपन हा याआधीही एकदा तुरूंगातून पळून गेला होता. पण तेव्हा तो तीन दिवसात पुन्हा पकडण्यात आला होता. आता त्याला मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये टाकण्यात आले असून त्याचा शोध घेतला जात आहे.

Read in English