हिरोईनसारखी दिसणारी ही तरूणी आहे ट्रक ड्रायव्हर, फोटो बघून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 13:58 IST2024-02-06T13:52:48+5:302024-02-06T13:58:55+5:30
आज आम्ही तुम्हाला एका अशा महिलेबाबत सांगणार आहोत जी एक ट्रक ड्रायव्हर आहे. ती दिसायला सुंदर आणि हॉट आहे.

सामान्यपणे ड्रायव्हरचं काम पुरूष करतात. कारण या कामात अनेक अडचणीचं आणि फार अवघड असतं. कुटुंबियांपासून अनेक दिवस दूर रहावं लागतं. ते गाडीवर अनेक दिवस परिवारापासून दूर राहतात. अशात ट्रक ड्रायव्हिंगच्या कामापासून महिला सामान्यपणे दूर राहतात.
पण आज आम्ही तुम्हाला एका अशा महिलेबाबत सांगणार आहोत जी एक ट्रक ड्रायव्हर आहे. ती दिसायला सुंदर आणि हॉट आहे. यामुळे तिला जगातील सगळ्यात ग्लॅमरस ट्रक ड्रायव्हर म्हटलं जातं. तिचं वय 25 असून नाव डेसेन हॅवोक (Daysen Havoc) आहे.
डेसेन मुळची अमेरिकेच्या इलिनोइसची राहणारी आहे. डेसेनला जिमनास्ट बनायचं होतं. पण एका ट्रक ड्रायव्हरमुळे तिला तिच्या स्वप्नावर पाणी सोडावं लागलं. एका मायनर अपघातामुळे तिला जिमनॅस्टिकपासून दूर व्हावं लागलं. अशात ती ट्रक चालवू लागली.
दरम्यान तिने ट्रक ड्रायव्हर म्हणून जवळपास 1 कोटी रूपये कमावले. पण गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये तिला नोकरीवरून काढण्यात आलं. पण नंतर तिने पुन्हा काम सुरू केलं
डेसेनने सांगितलं की, 'ट्रक ड्रायव्हरची नोकरी गेल्यावर काही लोकांनी मला कुचीच्या कामांसाठी कॉन्टॅक्ट केला. पण आता मी सगळ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे'.
ती म्हणाली की, गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये तिच्या करिअरमध्ये समस्या आली होती. कारण ती ज्या कंपनीत काम करत होती ती बंद पडली होती. अशात तिची नोकरी गेली होती.
डेसेनने सांगितलं की, नुकतंच तिला एक जनावरांना धुण्याचं एक काम मिळालं होतं. पण ते काही आनंद देणारं काम नव्हतं.
सोशल मीडियावर डेसेन अॅक्टिव असते. तिचे इन्स्टावरही 10 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तिला टिकटॉकवरही बरेच लोक फॉलो करतात. तिने सांगितलं की, तिला पुन्हा ट्रक ड्रायव्हरची नोकरी मिळाली.