जोडप्याने अँब्युलन्सचं केलं घर, फोटो पाहुन तुम्ही म्हणाल....नांदा सौख्य भरे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 18:40 IST2021-11-17T17:41:38+5:302021-11-17T18:40:31+5:30
अँब्युलन्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो लालभडक दिवा असणारी गाडी. पण या गाडीत घर तयार होऊ शकत असं आम्ही तुम्हाला म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का? एका जोडप्याने अँब्युलन्सचं घरं केलंय आणि त्यात ते सुखाने नांदत आहेत. पाहा Photo

एका जोडप्यानं अँब्युलन्स विकत घेऊन त्याचं अत्यंत देखणं घर तयार केलं आहे.
दोन लाख रुपयांत जुनी अँब्युलन्स विकत घेऊन त्याचा या जोडप्यानं कायापालट केला.
42 वर्षांचा मार्क बोनिटो आणि त्याची 36 वर्षांची पार्टनर सोफी यांनी ही कमाल केली.
या जोडप्यानं 2019 सालच्या मे महिन्यात ही अँब्युलन्स खरेदी केली.
2 लाख रुपयांत खरेदी केलेल्या या अँब्युलन्सवर त्यांनी आणखी थोडा खर्च करत त्याला घराचं रुप दिलं. या कामासाठी त्यांना २ महिने लागले.
सोफी स्वतः आरोग्य विभागात रेडिओग्राफर म्हणून काम करते.
The Sun च्या रिपोर्टनुसार ती जेव्हा मार्कला भेटली, तेव्हा त्याच्याकडं व्हॅन होती. त्यांना ५ मुलं असल्यामुळे ते डेटसाठी याच व्हॅनचा उपयोग करत असत.
व्हॅनमध्ये स्वयंपाक करणं अवघड जात होतं. त्यामुळेच त्यांनी व्हॅनऐवजी अँब्युलन्स विकत घेण्याचा निर्णय़ घेतला.
घर असताना अँब्युलन्समध्ये का झोपता, असं लोक त्यांना विचारतात. मात्र आपल्याला अँब्युलन्सच आवडत असल्याचं ते सांगतात.
अँब्युलन्सच्या आतील बांधकाम मार्कने केलं, तर त्याची सजावट सोफीने केली. या व्हॅनचं नाव फ्लोरेन्स असं ठेवण्यात आलं आहे.
अँब्युलन्समध्ये टीव्ही, शॉवर, मिनि डेक अशा अनेक सुविधा आहेत. जुन्या फर्निचरचा वापर करून त्यांनी कमी किंमतीत हे सर्व उभं केलं.
आता कुठल्याही सुंदर जागी जाऊन तिथंच ही अँब्युलन्स पार्क करून आम्ही मजेत राहू शकतो, असं हे जोडपं सांगतं. तर आमच्यापैकी कुणी आजारी पडलं तरी याच व्हॅनमध्ये राहू, असंही सोफी सांगते.