शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus : ना साप ना वटवाघुळ 'या' प्राण्यामुळे पसरला कोरोना व्हायरस, आता रिसर्चमधून दिला नवा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 2:37 PM

1 / 10
कोरोना व्हायरस पसरू लागल्यावर हा व्हायरस कोणत्या प्राण्यांमधून मनुष्यांमध्ये पसरला याचा शोध वैज्ञानिक घेऊ लागले होते. सुरूवातीला म्हटलं गेलं की, साप आणि वटवाघुळाचं सूप प्यायल्याने कोरोना व्हायरल पसरला. आता चीनमधील वैज्ञानिकांनी खवल्या मांजरात असा व्हायरस आढळल्याचा दावा केला आहे, जो जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरससोबत मिळता-जुळता आहे.
2 / 10
चीनच्या साउथ चायना अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, कोरोना व्हायरससाठी पॅंगोलिन म्हणजे खवल्या मांजर जबाबदार आहे. त्यांनी दावा केला होता की, लोकांना व्हायरसची लागण होण्याचं कारण खवल्या मांजर आहे.
3 / 10
ते म्हणाले होते की, कोरोना आधी वटवाघुळातून खवल्या मांजरात आणि नंतर खवल्या मांजरातून मनुष्यात शिरला होता. पण त्यावेळी जगभरातील वैज्ञानिकांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते.
4 / 10
आता नेचर जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, या प्राण्याचा जेनेटिक डेटा हे दाखवतो की, या प्राण्यांबाबत सावधानता बाळगणं गरजेचं आहे. बाजारात होणाऱ्या यांच्या विक्रीवरही बंदी घातली गेली पाहिजे. एका आंतरराष्ट्रीय टीमचं मत आहे की, भविष्यात संक्रमण टाळण्यासाठी सर्वच जंगली जनावरांच्या बाजारातील विक्रीवर बंदी केली पाहिजे.
5 / 10
खवल्या मांजराचा वापर खाण्यासाठी आणि अनेक पारंपारिक औषधे तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे याची सर्वात जास्त तस्करीही होते. वैज्ञानिकांनुसार, चीन आणि दक्षिण-पूर्व आशियातील जंगलांमध्ये आढळणाऱ्या खवल्या मांजरावर अधिक लक्ष ठेवून कोरोना व्हायरस पसरण्यात त्यांची भूमिका याबाबत माहिती मिळू शकेल.
6 / 10
हा प्राणी मुंग्या खातो. जगभरात सर्वात जास्त तस्करी या होत असल्याने हा जीव लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. चीनमध्ये या प्राण्याच्या त्वचेसंबंधी आणि सांधेदुखी संबंधी औषधे तयार केली जातात. तसेच लोक याचं मासही आवडीने खातात.
7 / 10
गुआंगझूच्या साउथ चायना अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी कोरोनाबाबत रिसर्च करताना 1 हजार जंगली प्राण्यांचे सॅम्पल घेतले. वैज्ञानिक शेन योंगी आणि जिओ लिहुआ यांनी दावा केला की, रूग्णांमधून घेतलेल्या सॅम्पलमधील कोरोना व्हायरस आणि खवल्या मांजरीचा जीनोम सिक्वेंस 99 टक्के एकसारखा आहे.
8 / 10
आधी चीनच्या वैज्ञानिकांच्या रिसर्चवर कॅंब्रिज युनिव्हर्सिटीचे व्हेटरनरी मेडिसिन सायन्सचे प्राध्यापक जेम्स वुड म्हणाले होते की, जीनोम सिक्वेंसच्या आधारावर व्हायरसचा पुरावा मिळत नाही. त्यानंतर चीनच्या वैज्ञानिकांनी आणखी रिसर्च केला आणि आता निष्कर्ष बरेच स्पष्ट झाले आहेत की, कोणत्या जीवामुळे कोरोना व्हायरस पसरला.
9 / 10
चायना बायोडायव्हर्सिटी कंझर्वेशन अॅन्ड ग्रीन डेव्हलपमेंट फाउंडेशननुसार, चीनमध्ये 200 पेक्षा जास् औषध कंपन्या आणि 60 पारंपारिक औषध ब्रॅन्ड खवल्या मांजराच्या तोंडापासून औषध तयार करतात.
10 / 10
भारतीय खवल्या मांजराचं वैज्ञानिक नाव Manis crassicaudata आहे. ही खवल्या मांजरांची एक प्रजाती आहे जी भारत, श्रीलंका, नेपाळ आणि भूतानमध्ये आढळते. ही प्रजाती पॅंगोलिनच्या आठ प्रजातींपैकी एक आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनResearchसंशोधन