शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : कोरोनाकाळात तो लक्झरी लाईफ जगला, तब्बल १४ महिने ५-स्टार हॉटेलमध्ये एकटाच राहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 6:01 PM

1 / 7
एका व्यक्तीने लॉकडाऊनमधील संपूर्ण काळ न्यूयॉर्कमधील एका फाइव्हस्टार हॉटेलमध्ये घालवला. रॉबर्ट मालिया नावाची ही व्यक्ती ७६ खोल्या असलेल्या या हॉटेलमध्ये सुमारे १४ महिने राहिली. मात्र मालिया हा मालकाची पसंती नव्हता. तरीही कोरोना महामारीच्या काळात कुणीच न भेटल्याने त्याला हॉटेलमध्ये राहता आले.
2 / 7
न्यूयॉर्क शहरामध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या संसर्गानंतर लॉकडाऊन लावण्यात आले होते. लॉकडाऊनमध्ये सारे काही बंद झाले. अशा परिस्थितीत अग्निशमन विभागाने कुठल्याही आपातकालीन स्थितीमध्ये एका व्यक्तीला इमारतीमध्ये ठेवण्यात यावे, अशी सूचना दिली. एका नियतकालिकाच्या वृत्तानुसार या घोषणेनंतर मिडटाऊनमध्ये असलेल्या चटवाल या फाइव्ह स्टार हॉटेलच्या सुरक्षेसाठी एका व्यक्तीची आवश्यकता होती. त्यासाठी रॉबर्ट मालिया याने उत्सुकता दर्शवली.
3 / 7
मिडटाऊनमध्ये असलेल्या या फाइव्ह स्टार हॉटेलच्या मालकाची रॉबर्च मालिया याला पहिली पसंती नव्हती. मात्र कोरोनाच्या साथीची भीती आणि अन्य लोकांनी कुटुंबाला प्राधान्य देत हॉटेलमध्ये थांबण्यास नकार दिला तेव्हा ३६ वर्षीय रॉबर्ट मालियाकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली.
4 / 7
रॉबर्ट मालिया याने सांगितले की, जिथे काम केले तिथे राहण्याच्या अनुभव खूप छान होता. ड्रिम हॉटेल ग्रुपमधील आर्किटेक्चरल डिझायनर ज्यांच्याकडे मॅनहॅटन हॉटेल आणि चटवालसारख्या उत्तम हॉटेलची साखळी आहे. त्यांच्या तुलनेत माझी अपार्टमेंट पाच मजली लक्झरी हॉटेलच्या तुलनेत खूप किरकोळ आहे.
5 / 7
रॉबर्ट मालिया यांनी सांगितले की, १४ महिन्यांपर्यंत हॉटेलच्या खोलीत राहताना येथे आपलेपणा वाटू लागला आहे. रॉबर्ट यांनी सांगितले की, जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी मला माझ्या खोलीची सवय होऊ लागली.
6 / 7
मालियाने सांगितले की, सकाळी साडेपाच वाजता उठल्यावर विविध प्रकारची हाऊसकिपिंगची कामे करणे, इतर गोष्टींकडे लक्ष ठेवणे हे माझे दैनंदिन काम बनले होते.
7 / 7
अग्निशमन डिपार्टमेंटच्या गाईडलाइननुसार आठवड्यातून एकदा सुरक्षा गार्ड आणि इमारतीचे मुख्य अभियंते हॉटेलला भेट द्यायचे, असे रॉबर्ट मालिया यांनी सांगितले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnited Statesअमेरिकाhotelहॉटेल