लॉकडाऊनचं उल्लंघन करणं आरोग्यमंत्र्यांना चांगलंच महागात पडलं; थेट पदावरूनच हटवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 05:00 PM2020-04-09T17:00:32+5:302020-04-09T17:24:22+5:30

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जगभरातून प्रयत्न केले जात आहेत. भारतात कोरोनाची लागण होण्यापासून जास्तीत जास्त लोकांना वाचवता यावं यासाठी अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण काहीजण लॉकडाऊनचं पालन न करता फिरताना दिसून येत आहेत.

त्यामुळे शासनाने जे लोक लॉकडाऊन न पाळता घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांवर कारवाई करायला सुरूवात केली आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

न्यूजीलंडमधील शासनाने कोरोनाचे संक्रमण थांबवण्याासाठी अनेक महत्वपूर्ण पाऊलं उचलली आहेत. पण सामान्य माणसं नाही तर आरोग्यमंत्र्यानीच शासनाच्या आदेशाचं पालन केलेलं नाही. मन्यूजीलंडच्या आरोग्यमंत्र्यांना लॉकडाऊनचं उल्लंघन करणं चांगलं महागात पडलं आहे.

न्यूजीलंडचे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी आरोग्यमंत्र्यांवर कारवाई करून त्यांना पदावरून हटवलं आहे. तसंच त्यांना जुनिअर रँकचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. आरोग्यमंत्र्यांचं नाव डेविड क्लार्क आहे. डेविड यांनी लॉकडाऊनचे नियम न पाळल्याने माझी चूक ण्यास मान्य करण्यास तयार आहे असं सांगितलं आहे.

डेविट क्लार्क यांनी असं सांगितलं की सध्या घडीला मला माझ्या कुटूंबासोबतचं रहायला हवं. त्यामुळे सर्व सामान्य लोकांपुढे आदर्श निर्माण होईल. मला माझ्या अपराधाची जाणीव आहे. त्यासाठी मलाच्या कृत्याबद्दल वाईट वाटतं असं ही ते म्हणाले.

पदावरून काढून टाकल्यानंतर डेविड क्लार्क यांनी स्वतःला इडिएट असा शब्दप्रयोग वापरला आहे.

कारण कोरोना व्हायरसच्या मोठ्या महामारीच्या संकटात न्यूजीलंड सरकारने लॉकडाऊन केलं असून सुद्धा आरोग्यमंत्री आपली पत्नी आणि मुलांसोबत समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद घेत होते.

डेविट क्लार्क यांना यांना चुकीची जाणीव होईपर्यंत फार उशीर झाला होता. त्यांना पदावरून हटवण्यात आलं होतं.