शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

'इथे' टॉयलेट सीटला वाकून केला जातो नमस्कार, पूजाही करतात; पाहा काय आहे ही प्रथा आणि यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:49 IST

1 / 7
Worship Toilet : जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक रितीरिवाज पार पाडले जातात. कुठे मूर्तींची पूजा केली जाते, कुठे प्राण्यांची पूजा केली जाते, कुठे झाडांची पूजा केली जाते तर कुठे दगडांची पूजा केली जाते. भारतातही वेगवेगळ्या प्रथा आहेत. पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, काही लोक टॉयलेट सीटची देखील पूजा करतात. नक्कीच हे जरा वाचायला विचित्र वाटू शकतं. पण हे सत्य आहे आणि त्याबाबत लोकांच्या काही मान्यताही आहेत. चीन आणि कोरियाच्या काही भागांमधील लोक टॉयलेट सीटची पूजा करतात आणि वाकून नमस्कार देखील करतात. चला पाहुयात काय आहे या प्रथेचं कारण...
2 / 7
चीन आणि कोरियामधील काही लोक आजही 'जिगु' किंवा 'पर्पल लेडी' नावाने प्रसिद्ध टॉयलेटच्या देवीची पूजा करतात. अंधविश्वास आणि लोककथांमधून तयार झालेली ही परंपरा स्वच्छतेचा संदेश तर देतेच, सोबतच भविष्य जाणून घेण्याचं एक माध्यमही मानली जाते.
3 / 7
चीनच्या काही भागांमध्ये 'जिगु' नाव असलेल्या देवीची पूजा फार पूर्वीपासून केली जाते. स्थानिक लोकांची मान्यता आहे की, जिगु देवी महिलांची रक्षक आहे आणि घरात सुख-शांती आणणारी देवी आहे. येथील लोक असं मानतात की, घरातील प्रत्येक कोपऱ्यात दैवी शक्ती असते आणि टॉयलेटसारखी जागाही यापासून वेगळी नाही. खासकरून महिला ही परंपरा अधिक फॉलो करतात.
4 / 7
ही अजब पूजा वर्षातून एकदाच केली जाते. चीनी कॅलेंडरनुसार वर्षातील पहिल्या पौर्णिमेच्या १५व्या दिवशी हा प्रथा पाळली जाते. याच दिवशी चीनमध्ये प्रसिद्ध 'लॅनटर्न फेस्टिव्हल' आयोजित केला जातो. या फेस्टिव्हलच्या शेवटच्या रात्री लोक मनोभावे टॉयलेट स्वच्छ करतात आणि देवीच्या स्वागताची तयारी करतात. ही वेळ नव्या वर्षात सुख-शांती मागण्यासाठी सगळ्यात शुभ मानली जाते.
5 / 7
या अनोख्या परंपरेबाबत अनेक लोककथा प्रचलित आहेत. पौराणिक कथांनुसार, प्राचीन काळातील एका महिलेला एका दुसऱ्या महिलेच्या ईर्षेचा आणि रागाचा सामना करावा लागला होता. या निर्दोष महिलेची टॉयलेटमध्ये हत्या करण्यात आली होती. या महिलेच्या आठवणीत आणि तिच्या आत्म्याला शांती देण्यासाठी लोकांनी तिला देवीचा दर्जा दिला. तेव्हापासून लोकांनी टॉयलेटमध्ये तिची पूजा करणं सुरू केली. जेणेकरून आणखी कुणासोबत असं होऊ नये.
6 / 7
पूजा करण्याआधी टॉयलेट सीट चांगली साफ केली जाते. त्यानंतर कागद किंवा कापड्याची एक बाहुली तयार करतात. जी देवी जिगुची प्रतीक असते. ही बाहुली टॉयलेट सीटजवळ किंवा कधी कधी किचनमध्ये ठेवली जाते. लोक देवीसमोर अगरबत्ती लावतात आणि पूजा करतात. देवीला वाकून नमस्कार करतात.
7 / 7
आता काळ खूप बदलला असला तरी लोकांची या गोष्टींवर मोठी श्रद्धा आहे. चीन आणि कोरियातील काही भागांमध्ये आजच्या आधुनिक युगातही ही परंपरा पार पाडली जाते. यात महिलांचा मोठा सहभाग असतो.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सchinaचीनJara hatkeजरा हटके