शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! तुरूंगातील कैद्याच्या प्रेमात पडली महिला जेलर, टॅटूमुळे तिलाच मिळाली शिक्षा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 10:05 IST

1 / 9
काय होईल जर एखाद्या तुरूंगाची महिला जेलर तेथील एखाद्या कैद्याच्या प्रेमात पडेल? प्रेमाच्या बदल्यात त्याला व्हिआयपी सुविधा दिल्या जातील. प्रत्यक्षात अशी एक घटना घडली असून ब्रिटनमधील एका महिला जेलरने चक्क कैद्याच्या नंबरचा टॅटूही काढून घेतलाय.
2 / 9
जेव्हा या गोष्टीचा खुलासा झाला तेव्हा तिला सस्पेंड करण्यात आलं. इतकंच नाही तर तिला तिने केलेल्या या कारनाम्यासाठी तुरूंगवासाची शिक्षाही सुनावली गेली.
3 / 9
या महिला जेलरचं नाव आहे स्कारलेट एल्डरिच. तिचं तुरूंगातील एका कैद्यासोबत अफेअर सुरू होतं. तिने प्रेमाच्या बदल्यात कैद्यासाठी तुरूंगात मोबाइल आणि सिम कार्डची व्यवस्था केली होती.
4 / 9
डेली मर्करीने दिलेल्या वृत्तानुसार, स्कारलेटच्या या कारनाम्याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा तिचं मेडिकल एक्झामिनेशन झालं.
5 / 9
ज्यात तिच्या पायावर एक रहस्यमय टॅटू आढळून आला. ज्यात कैद्याचा नंबर लिहिलेला होता. त्यानंतर तिची चौकशी केली गेली तेव्हा पूर्ण प्रकरण समोर आलं.
6 / 9
स्कारलेट एल्डरिचने वडिलही पोलीस अधिकारी आहे. असे सांगितले जात आहे की, स्कारलेट जेव्हा जेलर बनली नव्हती तेव्हापासून तिचं या कैद्यासोबत अफेअर होतं.
7 / 9
ती नेहमीच या कैद्याची मदत करत होती. दरम्यान असंही समोर आलं आहे की, ती तिच्या तुरूंगातील प्रियकराला पत्रही लिहित होती.
8 / 9
ब्रिटनमधील न्यायाधीशांनी स्कारलेटला तिच्या या गुन्ह्यासाठी १० महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने सांगितले की, तिच्या या कृत्याने केवळ कैद्याला फायदा झाला नाही तर तुरूंगाच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला.
9 / 9
इतर कैद्यांनी सांगितले की, त्या कैद्याबाबत स्कारलेट नेहमीच चिंतेत असायची आणि त्याच्यासोबत नेहमीच गप्पा करताना दिसत असायची.
टॅग्स :Englandइंग्लंडInternationalआंतरराष्ट्रीय