या वधुचा थाटच निराळा! गाडी, घोेडे नाही तर चक्क हॅलिकॉप्टरमधुन पाठवणी, पाहा photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 18:25 IST2021-11-28T18:03:07+5:302021-11-28T18:25:59+5:30
वडिलांचा सर्वात जास्त कोणावर जीव असतो तर तो म्हणजे त्यांची मुलगी. मुलीची इच्छा पुर्ण करण्यासाठी वडील काहीही करु शकतात. एका वडिलांनी लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीला एक अनोखं सरप्राईज दिलं. त्यांनी तिची पाठवणी चक्क हेलिकॉप्टरमधुन केली. पाहा फोटो

उत्तर प्रदेशमधील एका अनोळख्या पाठवणीची सध्या चर्चा सुरू आहे. UP मधील प्रतापगड याठिकाणी वधूची पाठवणी चक्क हेलिकॉप्टरमधून करण्यात आली.
वडिलांनी आपली लाडकी मुलगी उर्वशी सिंहला हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवले आहे.
सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. जवळपास दररोज लग्नातील विविध किस्से ऐकायला मिळतात. भारतीय लग्नांमध्ये मोठा खर्च देखील केला जातो.
आई-वडील देखील मुलांसाठी वाट्टेल ते करायला तयार होतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये पाहायवला मिळाला. एका वडिलांनी त्यांच्या मुलीची पाठवणी चक्क हेलिकॉप्टरमधून केली आहे.
नगर कोतवालीच्या सराईसागर गावात हा विवाहसोहळा पार पडला.
विनोद सिंह यांची मुलगी उर्वशी सिंह हिचा विवाह लालगंजमधील अर्जुनपूर याठिकाणी राहणाऱ्या अमित सिंहसोबत झाला. लग्नासाठी वरातीचा थाटही मोठा होता.
शनिवारी सकाळी ११ वाजता मुलीच्या वडिलांनी तिला हेलिकॉप्टरमध्ये बसवून नवऱ्याच्या घरी पाठवले.
हेलिकॉप्टरमधून जाणाऱ्या या पाठवणीचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ जमले होते.
११ वाजता हेलिपॅडवरून उड्डाण करून नववधू १५ मिनिटांत अर्जुनपूर येथील तिच्या सासरी पोहोचली.
वराचे वडील कमल सिंह सांगतात की, वधूच्या वडिलांनी लग्नात काहीतरी खास करायचं मनाशी ठरवलं होतं. लग्नात सरप्राईज म्हणून त्यांनी मुलीला हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवलं.