हवेतलं हटके हॉटेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 14:49 IST2018-10-17T14:35:47+5:302018-10-17T14:49:16+5:30

बंगळुरूत फ्लाय डायनिंग नावाचं नवं रेस्टॉरंट सुरू झालं आहे. यामुळे आता उंच आकाशात बसून जेवता येणार आहे.

फ्लाय डायनिंग रेस्टॉरंटमध्ये तब्बल 160 फूट उंचावर बसून जेवता येतं.

या ठिकाणी एकाचवेळी 22 जण जेऊ शकतात.

उंच आकाशात बसून आवडत्या पदार्थावर आडवा हात मारण्याची मजा काही औरच असते.

या ठिकाणी एका मॉकटेल सेशनचे 3 हजार 999 रुपये (प्रत्येक व्यक्तीमागे) आकारले जातात. एक मॉकटेल सेशन 30 मिनिटांचं असेल.

फ्लाय डायनिंग रेस्टॉरंटमध्ये डिनर करण्यासाठी एका व्यक्तीला 6 हजार 999 रुपये मोजावे लागतील. या डिनरसाठी एक तासाचा कालावधी दिला जातो.