भूक लागली म्हणून खाल्लं त्याने बर्गर, थोड्या वेळाने जीभ सुजून आली तोंडाबाहेर..कशी ते वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 03:53 PM2020-10-09T15:53:48+5:302020-10-09T16:01:38+5:30

काही लोकांच्या जीवनात अशा काही घटना घडतात ज्याची कधी कुणी कल्पनाही केलेली नसते. आता उटाहमध्ये राहणाऱ्या या मुलाबाबतच बघा ना. त्याने भूक लागली म्हणून मोठ्या आवडीने बर्गर बनवलं.

बर्गर खाताना त्याला डंश मारला आणि कोबची जीभ सुजून बाहेर आली. यानंतर कोबने व्हिडीओ तयार केला आणि अपलोड केला. हा व्हिडीओ आतापर्यंत ५३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.

या मुलाने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो निटपणे बोलूही शकत नाहीये कारण त्याची जीभ पूर्णपणे सूजलेली आहे.

ही घटना उटाहमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय कोब फ्रीमेनसोबत घडली. त्याने स्वत: बनवलेल्या बर्गरने त्याची अशी स्थिती होईल याची त्याने कल्पनाही केली नसेल.

उटाहच्या वेबर स्टेट यूनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या कोबला अचानक भूक लागली आणि त्याने बर्गर बनवण्याचा निर्णय घेतला. कोबने मोठ्या आवडीने बर्गर बनवलं.

बर्गर तयार करून तो काही वेळासाठी बाहेर गेला. परत येऊन त्याने लगेच बर्गर खाणं सुरू केलं. बर्गर संपताच त्याचा तोंडात वेदना होऊ लागली होती.

त्याने आरशात तोंड पाहिलं तर हैराण झाला. त्याच्या जीभेवर मधमाशी बसली होती. मधमाशीने त्याला डंश मारला होता. त्यामुळे त्याची जीभ सूजली होती.

कोबची जीभ इतकी सुजली की, तोंडातून बाहेर आली होती. मधमाशी बर्गरमध्ये जाऊन लपली होती. ज्याकडे कोबचं लक्ष गेलं नाही.

बर्गर खाताना त्याला डंश मारला आणि कोबची जीभ सुजून बाहेर आली. यानंतर कोबने व्हिडीओ तयार केला आणि अपलोड केला. हा व्हिडीओ आतापर्यंत ५३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.

Read in English