Photo : मगरीचं पोट फाडल्यानंतर सुन्न झाला शिकारी, सापडला ६००० वर्षांपूर्वीचा 'खजिना'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 14:03 IST2021-09-13T14:01:14+5:302021-09-13T14:03:32+5:30

डायनोसॉर यांच्या युगापासून मगर असल्याचा दावा अनेक पुरातत्व अभ्यासकांनी केला आहे. त्यामुळे डायनोसॉरच्या अंतानंतर पृथ्वीतलावर जीवंत असलेला सर्वात जुना प्राणी म्हणून मगरीचा उल्लेख केला, तर तो चुकीचा ठरणार नाही.

अमेरिकेतील एका शिकाऱ्यानं १३ फुट लांब मगरीची शिकार केली आणि जेव्हा त्यानं या मगरीचं पोट फाडलं तेव्हा शिकारीच सून्न झाला.

जॉन हॅमिल्टन नावाचा हा शिकारी त्या मगरीला कापण्यासाठी अमेरिकेतील शिकारी शेन स्मिथ याच्याकडे घेऊन गेला. जेव्हा या दोघांनी मगरीचं पोट फाडलं तेव्हा त्यांना तिच्या पोटात प्राचीन बाणाचं टोक आणि Plummet ( यंत्र) सापडलं.

ALच्या वृत्तानुसार Mississippi राज्यच्या भूविज्ञानी यांच्या माहितीनुसार तो बाण ५ ते ६ हजार वर्षांपूर्वीचा आहे. शेननं त्याच्या फेसबूकवर लिहिलं की, जॉन हॅमिल्टन हा आज १३ फूटांची मगर घेऊन आमच्याकडे आला. तिच्या पोटात सापडलेलं बाणाचं टोक व प्लमेट पुरातन काळातील आहेत. ज्याचा उपयोग मुळ अमेरिकन मासे पकडण्यासाठी करायचे. या मगरीच्या पोटात माशांची हाडंही सापडली.'

''मी याबाबत फेसबूक पोस्ट करू की नको, असा विचार मी करत होतो. कारण लोकांना यावर विश्वास बसणार नाही. पण, मी माझा विचार बदलला आणि ही माहिती शेअर केली.