'या' तारखेला होणार एलियन्स आणि मनुष्यांची भेट, वैज्ञानिकांनी सांगितलं काय होईल त्या दिवशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 01:13 PM2021-10-29T13:13:59+5:302021-10-29T13:21:07+5:30

दुसऱ्या दुनियेतील लोक म्हणजे एलियन्सबाबत नेहमीच चर्चा सुरू असते. पण त्यांचा शोध अजून लागला नाही. अनेक वैज्ञानिक एलियन्स असण्याची शक्यता नाकारत नाहीत, पण त्यांच्या असण्याबाबत ठोस पुरावे नाहीत.

या ब्रम्हांडात केवळ पृथ्वीवरच जीवन आहे का? दुसऱ्या ग्रहावर कुणी राहतं का? याबाबत सतत शोध सुरू असतात आणि लोकांनाही अशी प्रश्ने अनेकदा पडत असतात. दुसऱ्या दुनियेतील लोक म्हणजे एलियन्सबाबत नेहमीच चर्चा सुरू असते. पण त्यांचा शोध अजून लागला नाही. अनेक वैज्ञानिक एलियन्स असण्याची शक्यता नाकारत नाहीत, पण त्यांच्या असण्याबाबत ठोस पुरावे नाहीत.

अशात आता अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या स्पेस रिसर्च सेंटर जेट प्रोपल्शन लेबॉरेटरीच्या एका रिसर्चर्चच्या प्रीप्रिंट पेपरमधील अंदाजानुसार, या शतकाच्या शेवटी मनुष्य ज्युपिटर किंवा सॅटर्न म्हणजेच शनि ग्रहाच्या कमीत कमीत एका उपग्रहावर आपलं पाउल ठेवेल.

या पेपरमध्ये सर्वात इंटरेस्टींग अंदाज याबाबत लावण्यात आला आहे की, ३५० वर्षात म्हणजे सन २३८३ च्या आसपास मनुष्य सोलर सिस्टीमच्या बाहेर असलेल्या एखाद्या एलियन प्रजातीच्या संपर्कात येऊ शकतो.

मनुष्य २०३८ पर्यंत मंगळ ग्रहाच्या जमिनीवर पोहोचेल आणि सगळं काही ठीक राहिलं तर २०८६ पर्यंत शनिपर्यंत पोहोचतील. मनुष्य एक दिवस सन २२५४ पर्यंत आपल्या सोलर सिस्टीमच्या बाहेर जाऊन जवळच्या प्लेनेटरी सिस्टीम प्रॉक्सिमा सेंटॉरीपर्यंत जाऊन पोहोचू शकतो.

एखाद्या एलियनला भेटण्याबाबत वैज्ञानिकांना वाटतं की, असं २०८३ मध्ये शक्य होऊ शकतं. हे ध्यानात घेतलं पाहिलं की, जीवन असलेल्या ठिकाणाला कायम ठेवण्याची शक्यता असलेला जवळचा बिंदू अजूनही सोलर सिस्टीमपासून जवळपास १४ हजार प्रकाश वर्ष दूर स्थित आहे.

Read in English