शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

एका विषारीने सापाने दुसऱ्या विषारी सापाला दंश मारला तर काय होतं? त्यांच विष त्यांचा जीव घेतं का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:28 IST

1 / 6
Snake Venom Expert : वैज्ञानिक शोध आणि हर्पेटोलॉजिस्ट्सनुसार, जास्तीत जास्त विषारी साप स्वतःच्या प्रजातीच्या विषाविरुद्ध काही प्रमाणात प्रतिरोधक (रेझिस्टंट) असतात. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की, ते पूर्णपणे इम्यून असतात. त्यांचं शरीर विषाच्या प्रभावाला बऱ्याच प्रमाणात सहन करू शकतं. हे त्यांच्यात अनेक वर्षात झालेल्या त्यांच्या विकासातून घडलं. संभोग करताना, भांडणात साप एकमेकांना दंश करणं सामान्य बाब आहे. अशात प्रत्येकवेळी दंशामुळे जीव गेला असता तर सापांच्या प्रजातींचं अस्तित्वच धोकात असं असतं.
2 / 6
अनेक एक्सपर्ट सांगतात की, जास्तीत जास्त साप हे आपल्याच विषाबाबत पूर्णपणे नाही, पण काही प्रमाणात प्रतिरोधी असतात. म्हणजे ते विष पचवू शकतात. याला नॅचरल रेजिस्टेंस म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर जर एका कोब्रा सापाने जर दुसऱ्या कोब्रा सापाला दंश केला, तर विष नक्कीच शरीरात जातं. पण त्याचा प्रभाव घातक होत नाही. कारण कोब्राच्या शरीरात अशा अॅंटीबॉडी आणि प्रोटीन स्ट्रक्चर असतं, जे त्याच प्रजातीच्या विषाला बऱ्याच प्रमाणात निष्क्रिय करतं. जिथे दंश मारला गेला तिथे सूज, जखम किंवा कमजोरी येते. पण मृत्यूचा धोका बराच कमी असतो.
3 / 6
याउलट जेव्हा एखाद्या दुसऱ्या प्रजातीचा साप दुसऱ्याच प्रजातीच्या सापाला दंश मारतो, तेव्हा स्थिती बदलते. प्रत्येक सापाचं विष हे एकसारखं नसतं. कुणाचं विष हे न्यूरोटॉक्सिक असतं, जे नसां आणि श्वास घेण्याची प्रक्रियाही थांबवतात. तर कुणाचं विष हे हेमोटॉक्सिक असतं, जे रक्त आणि आतील अवयवांचं नुकसान करतं. काही सापांचं विष सायटोटॉक्सिक असतं, जे पेशींना सडवतं.
4 / 6
असा विचार करा की, एक रॅटलस्नेक ज्याचं विष हेमोटॉक्सिक असतं, जर एखाद्या कोब्राला दंश मारला, तर कोब्रा आपल्याच न्यूरोटॉक्सिक विषासोबत लढू शकतो, पण रॅटलस्नेकच्या विषापासून नाही. अशात स्थितीत सापाची स्थिती गंभीर होऊ शकते. इतकंच नाही तर जीवालाही धोका होऊ शकतो. हेच कारण आहे की, वेगवेगळ्या प्रजातींच्या सापांना एकमेकांना मारणं धोक्याचं मानलं जातं.
5 / 6
यात काही अपवादही आहेत. जसे की, किंग स्नेक, जे दुसऱ्या विषारी सापांना आपले शिकार बनवतात. त्यांच्या शरीरात विषाविरोधात असामान्य प्रतिरोध क्षमता असते. पण वैज्ञानिक स्पष्टपणे सांगतात की, ही क्षमता प्रत्येक सापात नसते. याला सामान्य नियम माननं भ्रम आहे. तर एक आश्चर्यकारक सत्य असंही सत्य आहे की, कधी कधी साप स्वत:ला सुद्धा दंश मारतात.
6 / 6
एकंदर काय तर सापांनी एकमेकांना दंश मारल्यानंतरही सामान्यपणे ते विषाने मरत नाहीत. कारण त्यांचं शरीर आधीच ते विष ओळखतात आणि निष्क्रिय करतात मृत्यू जर झाला तरी तो इन्फेक्शन, जखमा किंवा अत्याधिक तणावामुळे होतो, विषाने नाही. मुळात साप विषाचा वापर सूड किंवा क्रूरतेसाठी करत नाहीत. त्यांच्यासाठी विष हे एक हत्यार आहे, जे शिकार पकडण्यासाठी किंवा धोक्यापासून बचाव करण्यासाठी वापरलं जातं.
टॅग्स :snakeसापInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके