'या' शहरात आता थेट २०२१ मध्येच उगवणार सूर्य, २ महिने लोकांना रहावं लागणार अंधारात....

Published: November 20, 2020 11:38 AM2020-11-20T11:38:33+5:302020-11-20T11:46:29+5:30

इथे वर्षातले दोन महिने सूर्य उगवलेला असतो. त्यानंतर २ महिने लागोपाठ इथे रात्र राहते. पृथ्वीच्या इतर भागांमध्ये ज्याप्रमाणे रोज दिवस आणि रात्र होते तसं इथे होत नाही.

जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जी फारच वेगळी आणि अविश्वसनीय आहेत. जसे की डेड सी. यात काहीच बुडत नाही. असंच एक वेगळं ठिकाण अमेरिकेत आहे. या ठिकाणाचं नाव आहे अलास्का. अलास्का आपल्या सुंदरतेसोबत येथील वेगळ्या वातावरणामुळे चर्चेत राहतं. इथे वर्षातले दोन महिने सूर्य उगवलेला असतो. त्यानंतर २ महिने लागोपाठ इथे रात्र राहते. पृथ्वीच्या इतर भागांमध्ये ज्याप्रमाणे रोज दिवस आणि रात्र होते तसं इथे होत नाही. १८ नोव्हेंबरला या शहरातील लोकांनी अखेरचा सूर्य बघितला. आता २ महिने ५ दिवसांनंतर इथे सूर्य उगवणार.

जसे आपणा सर्वांना माहीत आहे की, पृथ्वी आपल्या एक्सिसवर फिरते. एक पूर्ण फेरी मारण्यासाठी तिला २४ तास लागतात. यातील १२ तास पृथ्वीवर सूर्यप्रकाश राहतो. मागच्या बाजूला अंधार असतो. इथे रात्र होते.

पृथ्वी सूर्याच्या चारही बाजूने फिरत असते. यासाठी ३६५ दिवस, ६ तास आणि ४८ मिनिटे लागतात. ज्याला आपण एक वर्ष मानतो. अनेक महिने आणि वेगवेगळ्या ऋतुंसोबत हे वर्ष संपतं.

पृथ्वी आपल्या एक्सिसवर वाकडी उभी आहे. त्यामुळे दोन्ही पोल्स नॉर्थ आणि साउथमध्ये एकत्र सूर्यप्रकाश पडत नाही. हेच कारण आहे की, नॉर्थमध्ये ६ महिने जर दिवस असेल तर साउथ पोलमध्ये ६ महिने रात्र असते.

नॉर्थ पोलला आर्कटिक सर्कल म्हणतात तर साउथ पोलला अंटार्टिका सर्कल. अलास्का हे शहर आर्कटिक सर्कलमध्ये येतं. त्यातही हे शहर इतर ठिकाणांपेक्षा अधिक उंचीवर आहे.

अशात आता १८ नोव्हेंबरनंतर या शहरावर सूर्यप्रकाश पडणार नाही. असं नाही की, इथे सूर्य उगवणारच नाही पण इथे ६५ दिवस सूर्यप्रकाश पडणार नाही.

अलास्कामध्ये १२ मे पासून ते २ ऑगस्टपर्यंत दिवस होता. यादरम्यान रात्रीही इथे सूर्यप्रकाश पडत होता. आता १८ नोव्हेंबरला लोकांनी इथे शेवटचा सूर्यप्रकाश बघितला. आता पुढील वर्षी येथील लोक सूर्याचं दर्शन घेऊ शकतील.

आता रात्रीनंतर येथील दिवसाबाबत जाणून घेऊ. इथे दिवसाचा वेळ अधिक असतो. इथे ८२ दिवसापर्यंत दिवस राहतो. असं नाही की, यादरम्यान सूर्य मावळत नाही. पण हे ठिकाण फार उंचीवर असल्याने सूर्यप्रकाश पडत राहतो. त्यामुळे दिवसासारखं वाटतं.

अलास्कामध्ये १२ मे पासून ते २ ऑगस्टपर्यंत दिवस होता. यादरम्यान रात्रीही इथे सूर्यप्रकाश पडत होता. आता १८ नोव्हेंबरला लोकांनी इथे शेवटचा सूर्यप्रकाश बघितला. आता पुढील वर्षी येथील लोक सूर्याचं दर्शन घेऊ शकतील.