शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय सांगता? ८ वर्षात ११६ मुलांचा पिता बनला; फेसबुकवर महिला करताहेत आई बनण्यासाठी विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 3:25 PM

1 / 9
इंग्लँडच्या डर्बीतील रहिवासी असलेले ६५ वर्षीय क्वीवे जोंस सध्या खूप चर्चेत आहेत. कोणात्याही माणसाला आई बनवण्यासाठी फेसबुकवर रिक्वेस्ट येत असतील अशी कल्पना सुद्धा केली जात नाही. पण हे खरं आहे. क्वीवे गेल्या वर्षांपासून स्पर्म दान करत आहे.
2 / 9
आतापर्यंत त्यांनी ११६ मुलांना जन्म दिला आहे. कोरोनाकाळात आयव्हीएफ इंडस्ट्रीला खूप नुकसान पोहोचलं. जेव्हा क्लीवेनं फेसबुकच्या माध्यमातून स्पर्म डोनेट करण्याची जाहिरात दिली तेव्हा महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लॉकडाऊनमध्ये क्लीवेला अनेक महिलांनी स्पर्म डोनेट करण्याची विनंती केली.
3 / 9
ब्रिटनमध्ये ३५ वर्षांवरील बऱ्याच महिला लग्न करण्याऐवजी आयव्हीएफच्या माध्यमातून गर्भधारणा करून मुलांचा सांभाळ करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बायोलजिकल क्लॉक संपण्याआधी आयव्हीएफ हा उत्तम मार्ग आहे.
4 / 9
ब्रिटनच्या आयव्हिएफ सेंटरमध्ये महिलांची खूप गर्दी असते. पण लॉकडाऊनच्याआधी त्या ठिकाणी स्पर्म डोनेट करत असलेल्यांची कमतरता होती. नियमांनुसार ब्रिटनमध्ये आयव्हीएफ डोनर ला ३५ युरो दिले जातात. आयव्हीएफनं जन्माला आलेल्या मुलांना १८ वर्षांनंतर आपल्या बायोलॉजिकल वडीलांबाबत माहिती दिली जाते.
5 / 9
ब्रिटनध्ये दरवर्षी ७ हजारांपेक्षा जास्त स्पर्म डोनेट केले जातात. कोरोनामुळे या ठिकाणी ४०० सेंटर्स बंद करण्यात आले आहेत. यामुळे ज्या महिलांना स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून गर्भधारणा करायची आहे. त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
6 / 9
या समस्येवर उपाय म्हणून महिलांनी फेसबूकचा आधार घेतला आहे. ब्रिटनमधील महिलांनी आधीही अमेरिका आणि डेनमार्कमधील स्पर्म डोनरर्सचा आधार घेतला होता. आता लॉकडाऊनमुळे समस्या वाढल्यानं फेसबूकद्वारे यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
7 / 9
क्वीवेप्रमाणे अनेक स्पर्म डोनर्सनी फेसबुकवर आपले प्रोफाईल बनवले आहे. संडे मेलनं दिलेल्या माहितीनुसार फेसबूकवर ७० पेक्षा स्पेशालिस्ट ग्रुप्स आहेत. जे लंडन आणि ब्रिटनमधील स्पर्म डोनरर्सची लिस्ट देतात.
8 / 9
क्वीवेनं आपल्या फेसबुक प्रोफाईलवर स्वतःबद्दल बरीच माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अनेक महिलांना माझ्याकडून पुन्हा स्पर्म डोनेट करून घ्यायचे आहेत. आतापर्यंत क्लीवे जोंस यांनी जन्म दिलेल्या १० मुलांची भेट घेतली आहे. क्वीवे स्पर्म डोनेशनचे काम सुरू ठेवण्यासाठी फेसबूकचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.
9 / 9
(Image Credit- Asianetnews)
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHealthआरोग्य