'या' मुलीच्या अंगावर तब्बल 103 टॅटू; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 16:07 IST2018-11-19T15:32:13+5:302018-11-19T16:07:12+5:30

अंगावर टॅटू काढून घेण्याची अनेकांना आवड असते. आपलं अथवा आपल्या आवडत्या व्यक्तीचं नाव किंवा एखाद्या चित्राचा टॅटू काढला जातो.
मुंबईतील एका 21 वर्षीय मराठी तरुणीने अंगावर जास्तीत जास्त टॅटू काढून घेण्याचा एक अनोखा विक्रम केला आहे.
तेजस्वी प्रभुलकर असं या तरुणीचं नाव असून तिने अंगावर तब्बल 103 टॅटूज काढून घेतले आहेत.
तेजस्वीच्या या विक्रमाची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. तेजस्वीने इन्स्टाग्रामवर तिच्या सर्व टॅटूचे फोटो पोस्ट केले आहेत.
वयाच्या सतराव्या वर्षापासून तेजस्वीने अंगावर टॅटू काढायला सुरुवात केली आहे. त्यानंतर 4 वर्षात तिने आता अंगावर टॅटू काढून अनोखा विक्रम केला आहे.
आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटना, प्रसंग यावर आधारित टॅटू तिने आपल्या शरीरावर काढून घेतले आहेत.
सुरुवातीला तिच्याही आई-बाबांचा याला विरोध होता. मात्र आता तो विरोध कमी झाला आहे. तेजस्वीने आई-बाबांचाही एक टॅटू काढला आहे.