शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

44 वर्षीय विवाहित शिक्षिकेच्या प्रेमात वेडा झाला 15 वर्षीय मुलगा आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 15:05 IST

1 / 10
15 वर्षाचा एक विद्यार्थी 44 वर्षीय विवाहित महिला टीचरच्या प्रेमात पडला. विद्यार्थी टीचरचं प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जात होता. विद्यार्थ्याने त्याच्या टीचरला अनेक ज्वेलरी गिफ्ट दिल्या आणि टीचरने त्या वापरल्या सुद्धा. पण एक दिवस असा आला जेव्हा त्यांचं नातं तुटलं. विद्यार्थी त्याच्या भावनांवर कंट्रोल करू शकला नाही आणि टीचरवर अनेक आरोप केले.
2 / 10
त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवण्यावरून टीचरवर ट्रायल चालू आहे. कोर्टात मुलाने पुन्हा एकदा सर्वांसमोर हे सांगितलं की, तो टीचरवर खूप प्रेम करतो. तो टीचरसाठी वेडा झाला होता. कोर्टाने सर्वांचं ऐकून घेतल्यावर निर्णय टीचरच्या बाजूने दिला आणि तिला लैंगिक शोषणाच्या आरोपातून मुक्त केलं.
3 / 10
टीचर आणि विद्यार्थ्यात हे प्रेम संबंध 2 वर्षाआधी 2019 मध्ये सुरू झाले होते. तेव्हा विद्यार्थी केवळ 15 वर्षांचा होता तर टीचर 44 वर्षांची होती. कोर्टात सुनावणी दरम्यान मुलगा म्हणाला की, मला नाही माहीत की प्रेम काय असतं. पण मला त्यांच्यासोबत रहायचं होतं. मी त्यांना खूप त्रास दिला जे चुकीचं होतं. पण मला ते तेव्हा जाणवलं नव्हतं.
4 / 10
नंतर मुलाने महिला टीचरवर आरोप केला की, टीचरने तिच्या कारच्या बॅक सीटवर त्याच्यासोबत संबंध ठेवले आणि टीचरने त्याला तिचे प्रायव्हेट फोटोही पाठवले होते. मग फोटोबाबत मुलगा म्हणाला की, त्याने टीचरला वाचवण्यासाठी काही मेसेज डिलीट केले होते.
5 / 10
2019 मध्ये विद्यार्थ्यासोबत सुरू झालेल्या नात्याबाबत महिला टीचरने सांगितलं की, तिने क्लासमध्ये मुलाला उदास पाहिलं होतं. त्यानंतर तिने मुलाला माइंडफलेनेस सेशनमध्ये बोलवलं. जेणेकरून त्याची मेंटल हेल्थ ठीक केली जावी. स्कूल सिस्टीमच्या माध्यमातून टीचरने या मुलाला इ-मेल केला.
6 / 10
या ईमेलवर मुलाने तिला घोस्ट इमोजी पाठवला. त्यानंतर टीचर म्हणाली की, त्यानंतर तो माझ्यासोबत स्नॅपचॅटवर बोलू लागला होता. महिला टीचर म्हणाली की, तो मला म्हणाला की, त्याला एक सीक्रेट शेअर करायचं आहे. पण ई-मेलवर त्याला विश्वास नाही. त्यानंतर मी त्याला ई-मेलमध्ये आपलं स्नॅपचॅट यूजरनेम दिलं. जेणेकरून त्याने मला सीक्रेट सांगावं. सीक्रेट हे होतं की, तो माझ्यावर प्रेम करत होता.
7 / 10
महिला टीचर म्हणाली की, मी फार लवकर कुणावरही विश्वास ठेवते. ती घाबरली होती कारण तिने मुलाला फारच शुल्लक कारणासाठी नॉन-स्कूल कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करून स्कूलचे नियम तोडले होते. ती म्हणाली की, तिला मुलगा म्हणाला की, तो आत्महत्येबाबत विचार करत होता आणि मला वाटलं की, त्याला अटेंशन मिळत नाहीये. मला बोलणं बंद करायचं होतं. पण त्याला वाटलं मला त्याच्यासोबत बोलायचं आहे.
8 / 10
हा विद्यार्थी अनेकदा टीचरच्या क्लासमध्ये घुसत होता. टीचरने सांगितलं की, तो तिच्या प्रायव्हेट पार्टला टच करत होता. तिने अनेकदा मुलाला रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तसं करणं थांबवलं नाही. जेव्हा महिला टीचरला विचारण्यात आलं की, तुम्ही याबाबत तक्रार का केली नाही? तर त्यांनी सांगितलं की, ती विचार करत होती की, तिने असं केलं तर यासाठी तिला जबाबदार धरलं जाईल. कारण ती मोठी आहे आणि मुलगा केवळ 15 वर्षांचा आहे.
9 / 10
महिला टीचरने सांगितलं की, मुलाने त्याला एका नेकलेससहीत अनेक गिफ्ट्स दिले. जे तिने परत करण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली की, मला त्याच्याकडून काहीच नको होतं. मला हेच वाटत होतं की, त्याने मला एकटं सोडावं. टीचरने सांगितलं की, मी अनेकदा मुलाने दिलेलं नेकलेस घालत होत. कारण मला वाटत होतं की, मी असं केलं नाही तर त्याला राग येईल आणि मला त्याला ती संधी द्यायची नव्हती. टीचरने सांगितलं की, मुलाने तिला त्याचे न्यूड फोटोही पाठवले होते. ज्याबाबत ती म्हणाली की, ते फोटो ती लगेच डिलीट करत होती आणि तिने मुलाला हे सगळं बंद करण्यास सांगितलं होतं.
10 / 10
ती म्हणाली की, जेव्हा मुलाने आत्महत्येचा विचारांबाबत सांगितलं तेव्हा ती त्याच्याबाबत चिंतेत होती. आणि तिला वाटत होतं की, त्याने असं करू नये. टीचरने सांगितलं की, तिने मुलाला खोटं सांगितलं होतं की, ती अमेरिकेत शिफ्ट होत आहे. तसेच हेही सांगितलं होतं की, स्ट्रेसमुळे ती दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये राहणार आहे. फोन जवळ राहणार नाही. मला वाटलं की, याने सगळं काही ठीक होईल.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट