'या' महिलेमुळे जगभरात पसरला टायफॉइडचा ताप, अशाच १० आश्चर्यकारक गोष्टी ज्या वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 02:33 PM2020-03-04T14:33:16+5:302020-03-04T14:58:45+5:30

जगभरात अशा कितीतरी विचित्र किंवा आश्चर्यकारक गोष्टी असतात ज्यांबाबत अनेकांना काहीच माहीत नसतं. अशाच काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

जगभरात अशा अनेक रोमांचक गोष्टी आहेत ज्यांनी लोक हैराण होतात. जसे की, तुम्हाला त्या महिलेबाबत माहीत आहे का, जिच्यामुळे जगभरात टायफॉइडचा ताप पसरला? कदाचित हे तुम्हाला माहीत नसेल. पण आज आम्ही तुम्हाला अशाच १० गोष्टी सांगणार आहोत, ज्यांबाबत वाचून तुम्ही चकित व्हाल.

असे सांगितले जाते की, पृथ्वीवर जेवढ्या मूंग्या आहेत त्या सर्वच मुंग्यांचं वजन मनुष्याच्या एकूण वजनाच्या बरोबर आहे.

तुम्ही हे नेहमीच पाहिलं असेल की, लहान मुलं सतत प्रश्न विचारत राहतात. कदाचित तुम्ही ते मोजत नसाल, पण एका रिसर्चनुसार, लहान मुले दिवसभरात साधारण ३०० प्रश्न विचारतात.

मधमाश्या किती भयावह असतात हे सर्वांनाच माहीत आहेत. त्या जर चावल्या तर विषयच संपला. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, मधमाश्या एकमेकींनाही चावतात. होय हे खरं आहे.

चिलीमधील अटाकामा वाळवंट हा पृथ्वीवरील सर्वात जुन्या वाळवंटापैकी एक मानला जातो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हजारो वर्षांपासून इथे पावसाचा एक थेंबही पडला नाही.

कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी असल्याचं तुम्हाला माहीत असेल. मात्र, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, कुत्रे जवळपास १६५ शब्दांची शब्दावली ओळखणे शिकू शकतात. त्यात इंग्रजीच्या अनेक शब्दांचा समावेश आहे.

कोआला हा एक असा प्राणी आहे ज्याचे फिंगरप्रिंट्स मनुष्यांसारखे असतात. त्यांचे फिंगरप्रिंट्स मनुष्यांच्या फिंगरप्रिंट्ससोबत इतके मिळते जुळते असतात की, कधी कधी तज्ज्ञही ओळखू शकत नाहीत.

कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील डायनासोर हे सर्वच महाद्वीपांवर राहत होते. अंटार्टिकावरही ते होते. प्रत्येक महाद्वीपावर त्यांचे जीवाश्म मिळाल्यावर वैज्ञानिक या निष्कर्षावर पोहोचले.

तुम्ही ड्रॅकुलाचं नाव तर ऐकलं असेलच. तोच ड्रॅकुला जो मनुष्यांचं रक्त पित होता. प्रसिद्ध लेखक ब्राम स्टोकर यांच्या कादंबरीतील भयावर कॅरेक्टर. मुळात ड्रॅकुला कादंबरी ही पूर्व यूरोपच्या ट्रान्सिल्वेनिया परिसरावर आधारित होती. येथील एक राजा व्लाड टेपेसवर एक ऐतिहासिक पुस्तक लिहिण्यात आलं होतं. ब्राम स्टोकर यांनी त्याच राजाचे वडील व्लाड ड्रॅकुलाच्या व्यक्तिमत्वावरून ड्रॅकुलाचं कॅरेक्टर रेखाटलं होतं. (Image Credit : Social Media)

नेपोलियन बोनापार्ट यूरोपमधील सर्वात शक्तीशाली शासकांपैकी एक होता. पण त्याला एकदा सशांकडून पराभूत व्हावे लागले होते. मोठ्या प्रयत्नांनंतर तो आपला जीव वाचवू शकला होता.

टायफॉइड मेरी एक प्रसिद्ध महिला होती. ती आयरिश महिला होती आणि तिचं पूर्ण नाव मेरी मल्लन होतं. ती १८८० मध्ये अमेरिकेत आली होती. तिच्या टायफॉइडच्या तापाचे कोणतेही लक्षणे नव्हती, पण तिच्या रक्तात टायफॉइडचे बॅक्टेरिया होते. ही बाब डॉक्टरांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. कारण तिला तापच येत नव्हता. पण ती हे मानायला तयारच नव्हती. ती लोकांच्या घरात स्वयंपाकाचं काम करत होती. असे म्हणतात की, तिनेच टायफॉइडच्या बॅक्टेरियाने अनेकांना संक्रमित केलं होतं. ज्यात अनेकांचा मृत्यू झाला होता.