Flashback 2020 : जग बदलवून टाकणाऱ्या २०२० या वर्षातील ५ घटना

By मोरेश्वर येरम | Published: December 24, 2020 01:47 PM2020-12-24T13:47:33+5:302020-12-24T14:35:52+5:30

२०२० या वर्षाची इतिहासात नोंद होईल यात शंका नाही. कोरोना महामारीमुळे लोकांना घरातून बाहेर पडणं शक्य होत नव्हतं. इतकी बंधनं यावर्षात संपूर्ण जगानं या वर्षात अनुभवली. पण केवळ कोरोनामुळेच हे वर्ष वेगळं ठरलं असंही नाही. कोरोना व्यतिरिक्तही काही महत्वाच्या घटनांमुळे हे वर्ष लक्षात राहील.

२०२० या वर्षात कोविड-१९ च्या उद्रेकानं संपूर्ण जग बदललं. या वर्षात कोट्यवधी लोकांना व्हायरची लागण झाली आणि लाखो लोकांचा मृत्यू या महामारीमुळे झाला. जगातील बहुतांश देशांना कडक लॉकडाऊन पाळावा लागला. यात कार्यालयं, वाहतूक व्यवस्था, शाळा, बाजार, महाविद्यालयं सारंकाही बंद ठेवावं लागलं.

उत्तर कोरिआचा हुकूमशहा किम जोंग उन याचा ब्रेनहॅमरेजने मृत्यू झाल्याची अफवा सोशल मीडियात पसरली होती. किम जोंगच्यानंतर त्याची बहिण किम यो जोंग हिच्या समर्थनार्थ नेटिझन्स सक्रीय झाले होते. पण किम जोंग उन जिवंत असल्याचं नंतर निष्पन्न झालं आणि सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.

पोलंडने त्याच्या शेजारी राष्ट्र असलेल्या झेक रिपब्लिकची जमीन चुकीने बळकावली असल्याची जाहीर कबुली दिली होती. पोलंडने झेक रिपब्लिकमधील एका चॅपलवर ताबा मिळवला होता. तसेच त्यांनी काही दिवस त्या ठिकाणी मुक्कामही केला होता. इतकंच नव्हे, तर पोलंडच्या सैनिकांनी झेक रिपब्लिकहून येणाऱ्या नागरिकांना आतही येऊ दिलं नव्हतं.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनकडून UFO चे तीन व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा एलियनसबाबत चर्चा सुरू झाली होती.

कोरोनाचं संकट कमी होतं की काय, अशातच पाकिस्तानच्या दिशेनं भारताकडे आलेल्या टोळधाडीनं सारंकाही उध्वस्त केलं. जुलै २०२० मध्ये पाकिस्तानातून राजस्थान आणि मध्यप्रदेश मार्गे आलेल्या टोळधाडींनी विदर्भातल्या नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात धडक दिली होती. संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्याचं या किटकांनी मोठं नुकसान केलं होतं. एका टोळधाडीत कोट्यवधी किटक असतात. अशाच प्रकारची टोळधाड आफ्रिकेच्या पश्चिम भागातही पाहायला मिळाली होती.

Read in English