इटलीमध्ये तयार होतंय वुहान, कोरोनाचं दुसरं सर्वात खतरनाक केंद्र, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 03:07 PM2020-03-09T15:07:51+5:302020-03-09T15:13:01+5:30

कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला आहे. चीन अन् इटलीला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. चीनमध्ये सद्यस्थितीत 80,735 लोकांना संसर्ग झालेला आहे. तसेच 3119 जणांचा मृत्यू ओढावलेला आहे.

इटलीमध्ये 7375 लोकांना संसर्ग झाला असून, चीननंतर सर्वाधिक मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये कोरोना व्हायरसनं आतापर्यंत 266 जणांचा मृत्यू झाला आहे

या जीवघेण्या व्हायरसचं दुसरं खतरनाक केंद्र म्हणून इटली समोर आलं आहे. पंतप्रधान जियुसेप्पे काँटे यांनी या देशातील अनेक भागात लॉकडाऊन केलं आहे.

इटली सरकारच्या या आदेशानंतर लोम्बार्डी, मोडेना, पर्मा, पियासेंजा, रेजियो एमिलिया, रिमिनी, पेसारो, अर्बिनो, एलेसांड्रिया, अस्ती, नोवारा, वर्बानो-कुसियो-ओसोला, वर्सिली, पादुआ, ट्रेविसो आणि वेनिसमधील जवळपास 1.60 कोटी लोक नजरकैद झाले आहेत.

रेल्वे, विमान आणि बस सारख्या अतिमहत्त्वाचा सेवाच फक्त सुरू आहेत. कोणीही क्वारंटिनच्या नियमांचं उल्लंघन केल्यास त्याला तीन महिने तुरुंगवास आणि 17,215 रुपये दंडाची रक्कम आणि दोन वर्षांची शिक्षा मिळू शकते.

या देशातील बार आणि रेस्टॉरंट खुले आहेत. परंतु सरकारी आदेशानुसार एका टेबलापासून दुसऱ्या टेबलापर्यंतचं अंतर जवळपास तीन फूट आहे.

इटलीच्या पर्यटकांना परत मायदेशी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी इटली सरकारने कठोर पावले उचलल्यामुळे रविवारी देशातील जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्येला घरातच थांबून राहावे लागले आहे.

चीनच्या बाहेर कोविड-19चे सगळ्यात जास्त बळी इटलीतच झाले आहेत. व्हेनिस शहरात आणि आर्थिक राजधानी मिलानमध्ये मिळून 15 दशलक्ष (दीड कोटी) लोकांची घरे ही एकांतवासाची (क्वारंटाईन) बनली आहेत,

तर संपूर्ण देशभर चित्रपटगृहे, संग्रहालये बंद ठेवण्यात आली आहेत. अर्जेंटिना या लॅटिन अमेरिकन देशात कोरोना व्हायरसने पहिला मृत्यू झाला आहे.

या जहाजावरील १९ कर्मचारी आणि दोन प्रवाशांना या विषाणूची बाधा झाली आहे. जहाजावरील ४५ जणांची यासाठी तपासणी झाली होती.