लग्नादिवशीच नववधूचे नाव गिनिज बुकमध्ये नोंद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 15:59 IST2019-02-13T15:46:58+5:302019-02-13T15:59:53+5:30

प्रत्येक नववधूला तिचा ड्रेस सुंदर आणि अनोखा असावा असे वाटत असते. असेच एक अनोखे लग्न पार पडले आहे. या वधूने लांबलचक ड्रेस घातल्याने गिनिज बुकमध्ये जागा मिळविली आहे.

सायप्रसची राहणारी मारिया हिने तिच्या लग्नात 7 हजार मिटर लांबीचा ड्रेस घातला होता. जगातील सर्वात मोठा गाऊन आहे.

हा गाऊन डिझाईन करण्यासाठी 3 लाख 18 हजार रुपयांचा खर्च आला आहे. ग्रीसच्या एका कंपनीला हा ड्रेस बनविण्यास दिला होता. त्यांना हा ड्रेस बनविण्यासाठी तीन महिने लागले.

लग्नाच्या दिवशी छोट्या ट्रकच्या मदतीने रोल केलेला हा ड्रेस मैदानात पसरविण्यात आला होता. जवळपास 6 तासांच्या प्रयत्नांसाठी 30 लोकांनी हा ड्रेस सांभाळला होता.

या लग्नावेळी गिनिज बुकची टीमही उपस्थित होती.