शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कल्पनेला तोड नाही! रेस्टॉरंट अँड बारच्या 'या' भन्नाट थीमची जगात चर्चा, तुम्हीही व्हाल अवाक्; एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 7:25 PM

1 / 5
असे म्हटले जाते की, गुन्हेगारांना कारागृहात त्यांच्या कृत्याची शिक्षा दिली जाते. पण इंग्लंडमध्ये एक कारागृह आहे, जेथे कैदी बनल्यानंतर कैद्यांना मद्यपान करण्यास दिले जाते. याच कारणामुळे हे ठिकाण सध्या एक एंडवेंचर ठिकाण बनले आहे आणि लोक दूरवरुन येथे भटकंतीसाठी येत आहेत.
2 / 5
वास्तविक, लंडनच्या शोर्डिच  येथे असलेल्या अल्कोट्राज सेल ब्लॉक टू वन टू (Alcotraz Cell Block Two One Two)  बारला तुरुंगाची थीम देण्यात आली आहे. येथे येणारे सर्व लोक नारंगी रंगाच्या कैद्यांसारखे कपडे घालतात आणि नंतर एका कोठडीतत्यांना  बंद करतात, जेथे त्यांना दारू दिली जाते. हा एक खास अनुभव आहे.
3 / 5
सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे इथे येणाऱ्या लोकांना दारू तस्करीचा खेळ खेळण्यास दिला जातो. त्यांना तो खेळावे लागेल. तस्करीमध्ये यशस्वी झाल्यानंतर, त्याला त्याच्या सेलमध्ये आत बसलेल्या साथीदारासह त्याच्या आवडत्या दारूचा आनंद घेता येतो.
4 / 5
मिररच्या रिपोर्टनुसार, या बारमध्ये आल्यानंतर तुम्हाला ड्रिंक्स मेनू दिला जात नाही. हे तुरुंग असल्याने, तुम्हाला मद्याची तस्करी करावी लागेल, येथे उभे असलेले रक्षक तुम्हाला लपण्यास मदत करतील. यानंतर, मेटल डिटेक्टरजवळ उभे रहा आणि सेलकडे जाण्याची प्रतीक्षा करा. एक एक करून लोक आत जातात. या बारशी संबंधित सर्व रोचक माहिती बारच्या अधिकृत साइटवर देण्यात आली आहे.
5 / 5
या बारमध्ये येण्यासाठी 35.99 पौंड म्हणजेच सुमारे 3600 रुपये भारतीय चलनात खर्च करावे लागतील. त्याची तिकिटे बारच्या वेबसाइटवरूनच बुक करता येतात. आता कोरोनाव्हायरसमुळे ब्रिटनमध्ये लॉकडाऊन निर्बंध हटवण्यात आले आहेत, लोक या ठिकाणाचा खूप आनंद घेत आहेत.  (सर्व फोटो - Alcotraz )
टॅग्स :jailतुरुंगPrisonतुरुंगJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय