शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

US Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्रांनी साधला 'अचूक' निशाणा! रशियाने मागून काय खेळ खेळला? खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 16:10 IST

1 / 9
मागील काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत युद्ध सुरू आहे. यामध्ये सुरुवातील अमेरिकेने इराणवर हल्ला केला होता. यामध्ये इराणचे प्रमुख नेते खामेनेई यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. इराणने यानंतर अमेरिकेच्या लष्करी तळांवर जोरदार हल्ले केले.
2 / 9
अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना इराणने फक्त धमकी दिली नाही, तर आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर वारंवार क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आहेत. इराणने अमेरिकेच्या युद्धनौकांनाही लक्ष्य केले आहे. या परिस्थितीमुळे अमेरिका आणि आखाती देशांना ड्रोन रोखण्याच्या तंत्रज्ञानासाठी युक्रेनची मदत मागावी लागली आहे. यामुळे आता इराणच्या क्षेपणास्त्राचा अचूक निशाणा कसा लागत असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. यामागे आता रशियाचे असल्याचे समोर येत आहे.
3 / 9
मिळालेल्या माहितीनुसार, या युद्धात रशिया इराणचा डोळा बनला आहे. 'रशिया इराणला संवेदनशील गुप्त माहिती पुरवत आहे, यामध्ये अमेरिकेच्या युद्धनौका आणि लष्करी विमानांच्या अचूक ठिकाणांचा समावेश आहे, असा दावा अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे.
4 / 9
आधुनिक युद्धात उपग्रह गुप्तचर माहिती आणि इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंगची भूमिका झपाट्याने वाढत असताना रशिया इराणला ही मदत पुरवत असल्याचा दावा केला आहे.
5 / 9
रशिया आपल्या उपग्रह नेटवर्कमधून गोळा केलेले फोटो आणि माहिती इराणला पाठवत असल्याचे मानले जाते, यामध्ये अमेरिकी सैन्य, जहाजे आणि विमानांच्या हालचालींच्या माहितीचा समावेश आहे.
6 / 9
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेत असे कोणतेही सहकार्य नाकारले असले तरी, मॉस्को आणि तेहरानमधील वाढते लष्करी संबंध पाहता असे सहकार्य शक्य आहे, असे विश्लेषकांना वाटते.
7 / 9
युद्धात रशिया आणि चीनकडून मदत मिळत असल्याचे इराणने आधीच उघड केले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, दोन्ही देश इराणला लष्करी मदत पाठवत आहेत.
8 / 9
गेल्या काही वर्षांत रशिया आणि इराणमधील संरक्षण संबंध वेगाने मजबूत झाले आहेत. युक्रेन युद्धादरम्यान इराणने रशियाला ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पुरवली होती आणि आता रशियादेखील इराणच्या पाठीशी उभा आहे.
9 / 9
या युद्धात चीन सावधगिरी बाळगत असल्याचे दिसत आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या अंदाजानुसार चीन इराणला आर्थिक मदत, सुटे भाग आणि क्षेपणास्त्रांशी संबंधित उपकरणे पुरवण्याची तयारी करत असावा. इराणच्या तेलावरील अवलंबित्व आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संभाव्य अडथळ्यामुळे चीन सध्या संतुलित भूमिका घेत आहे.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणrussiaरशिया