शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा

By admin | Published: January 23, 2016 12:00 AM

1 / 10
टेनेसी नार्थ कॅरोलिना केंटुकी राज्यांमध्ये या वादळामुळे झालेल्या अपघातात आठ व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहेत.
2 / 10
वादळ गेल्यानंतर दोन फुटांपर्यंत बर्फ साठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
3 / 10
नॉर्थ कॅरोलिना राज्यामध्ये एक लाख घरांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.
4 / 10
जोनास या हिमवादळामुळे अमेरिकेतील पूर्व भागात आणिबामी जाहीर करण्यात आली आहे.
5 / 10
अत्यंत बिकट परिस्थिती ओढवू शकते हे ओळखून नागरिकांनी मॉल्समधून मिळेल ते साहित्य घरी साठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मॉलमध्ये पदार्थांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे.
6 / 10
या वादळाचा फटका विमानप्रवासाला बसला असून पूर्व किना-यावरील राज्यांमधील विमानांची असंख्य उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शुक्रवारी व शनिवारी मिळून जवळपास ६००० उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे.
7 / 10
अमेरिकेतल्या २० राज्यांमधील ८.५ कोटी नागरिकांना हिमवादळापासून गंभीर धोका असल्याच्या व प्राणहानीही होऊ शकते अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
8 / 10
या हिमवादळामुळे खेळांचे सामने सार्वजनिक कार्यक्रम इत्यादी गोष्टी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
9 / 10
हिवाळी वादळ जोनास अमेरिकेच्या पूर्व किना-यावरील पाच कोटी लोकांचे जीवन असह्य करेल असा अंदाज आहे.
10 / 10
अमेरिकेच्या पूर्व किना-यावर गेल्या दोन दिवसांपासून जोनास हे बर्फाचे वादळ आले असून पूर्वेकडील राज्यांमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे.