"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 09:55 IST
1 / 9अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात बोलताना, भारत-पाकिस्तान संघर्षाचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे. 2 / 9एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांसोबत बोलताना ट्रम्प म्हणाले, अनेक वेळा असे होऊ शकते की पुतिन आहेत पण झेलेन्स्की नाहीत, मात्र मी दोघांना एक केले. जर मी आर्थिक निर्बंध लादले नसते, तर विश्व युद्ध देखील होऊ शकत होते.3 / 9डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'माला वाटते की, मी हे केले नसते तरा, युक्रेनने विश्व युद्ध सुरू केले असते आणि असे काही व्हावे, अशी आमची इच्छा नाही. जर मी भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्ध रोखले नसते, तर अणु युद्धही होऊ शकले असते. 4 / 9मी बघितले की, 7 विमान पाडली आहे, तेव्हा मला वाटले, हे योग्य नाही. 150 मिलियन डॉलरचे विमान पाडण्यात आले. कदाचित आकड्या याहूनही मोठा असू शकतो. 5 / 9पुन्हा भारत-पाकिस्तान संघर्षाचा उल्लेख - ट्रम्प म्हणाले, पंतप्रधान मोदी हे फाच छान व्यक्ती आहेत. त्यांच्याशी बोलताना मी विचारले, आपल्यात आणि पाकिस्तानात काय सुरू आहे. यानंतर मी पाकिस्तानसोबत व्यापारासंदर्भात बोललो. 6 / 9तेव्हा मी पाकिस्तानलाही विचारले, आपल्यात आणि भारतात काय सुरू आहे? दबरदस्त द्वेश होता. हे वेगवेगळ्या नावाने बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे.7 / 9तुम्ही लोक एक दिवस अणुयुद्धात उडी घ्याल - ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, आपल्यासोबत कुठल्याही प्रकारचा व्यापार करार करण्याची इच्छा नाही. तुम्ही लोक एक दिवस अणुयुद्धात उडी घ्याल. ते म्हणाले, नाही आम्हाला करार करायचा आहे... 8 / 9'एवढे जबरदस्त टॅरिफ लाऊ की...' ...यावर मी म्हणालो की उद्या मला पुन्हा फोन करा, मात्र, आम्ही तुमच्याशी कोणताही करार करणार नाही. जर आम्ही असे केले, तर तुमच्यावर एवढा कर (टॅरिफ) लावू की तुमचे डोके चक्रवून जाईल. आणि साधारणपणे पाच तासांत सर्व काही घडले.9 / 9ट्रम्प पुढे म्हणाले, 'आता हे पुन्हा सुरू झाले, तर मला माहीत नाही. पण, असे काही होईल, असे मला वाटत नाही आणि जरी झाले, तरी मी ते थांबवेल. आम्ही अशा गोष्टी होऊ देऊ शकत नाही.'