या देशांमध्ये आहे फटाके फोडण्यास बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 22:21 IST2018-10-26T22:10:03+5:302018-10-26T22:21:49+5:30

ऐन दिवाळीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर निर्बंध लागू केल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र जगात असेही काही देश आहेत जिथे फटाके फोडण्यावर पूर्णपणे बंदी आहे.

भारताप्रमाणेच नेपाळमध्येही दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. मात्र नेपाळमध्ये २००६ पासून फटाके फोडण्यावर बंदी लागू करण्यात आलेली आहे.

चीनने आपल्या देशातील बहुतांश भागात १९९० पासूनच फटाकेबंदी लागू केलेली आहे.

पाकिस्तानमध्ये विस्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत फटाके फोडण्यावर बंदी लागू आहे. मात्र तरीही नियमभंग करून पाकिस्तानी नागरिक फटाके फोडतात.

१९७० साली फटाके फोडताना काही जणांचा मृत्यू झाल्यानंतर सिंगापूरमध्ये अंशत: फटाकेबंदी लागू करण्यात आली होती. तर १९७२ पासून देशात पूर्णपणे फटाकेबंदी लागू केली गेली आहे.

ब्रिटनमध्ये दिवाळी, चिनी नववर्ष आणि नववर्षाला तुम्ही फटाके फोडू शकता. मात्र सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.


















