हे आहेत जगातील सर्वात धोकादायक प्राणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 03:06 PM2019-11-16T15:06:06+5:302019-11-16T15:40:27+5:30

या जगात लाखो प्रकारचे प्राणी आणि जीवजंतू वास्तव्य करून आहे. या सर्व प्राणीमात्रांमधील काही जीव हे अत्यंत धोकादायक मानले जातात. अशाच प्राण्यांचा घेतलेला आढावा.

शार्क आणि लांडग्यांना जगातील सर्वात धोकादायक प्राणी समजले जाते. या प्राण्यांमुळे वर्षाकाठी सरासरी दहा जणांचे प्राण जात असल्याची नोंद आहे.

जमिनीवरील सर्वात हिंस्र प्राण्यामध्ये सिंहाची तर सर्वात शक्तिशाली प्राण्यांमध्ये हत्तीची गणना होते. या प्राण्यांच्या हल्ल्यात दरवर्षी प्रत्येकी सरासरी 100 जणांचा जीव जातो.

पाणघोडा हा प्राणी शाकाहारी आहे. पण तो तितकाच हिंस्र आहे. त्याच्या हल्ल्यात दरवर्षी सुमारे 500 जण मृत्युमुखी पडतात.

मगर हा उभयचर प्राणी खूप धोकादायक मानला जातो. मगरींच्या हल्ल्यात दरवर्षी जगभरातील 1000 जणांचा मृत्यू होतो.

टेपवर्म या या परजिवी जंतुमुळे दरवर्षी सुमारे 2 हजार जणांना प्राण गमवावे लागते.

टेपवर्मप्रमाणेच एस्केरिस राउंडवर्म हा जीवसुद्धा परजिवी आहे. तो दरवर्षी सुमारे 2500 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो.

विविध प्रकारच्या माशा आणि कीटकांमुळे दरवर्षी सुमारे 10 हजार जणांचा मृत्यू होतो. हे स्वत: मृत्यूचे कारण ठरत नाहीत तर त्यांच्या शरीरावरील परजीवी मृत्यूचे कारण ठरतात.

कुत्रा हा माणसाचा सर्वात लाडका पाळीव प्राणी मानला जातो. मात्र दरवर्षी श्वानदंशामुळे सुमारे 25 हजार मृत्यू होतात.

सर्वच साप विषारी नसतात. मात्र सापांच्या काही विषारी प्रजातीमधील सर्पांनी केलेल्या दंशामुळे दरवर्षी सुमारे 50 हजार मृत्यू होतात.

मानव हा सुद्धा भूतलावरील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मानवी हिंसाचारामध्ये दरवर्षी सुमारे 4 लाख 75 हजार माणसांचा आपला जीव गमवावा लागतो.

डास हे सुद्धा जगातील सर्वात धोकादायक जीवांपैकी एक आहेत. डासांच्या चावण्यामुळे विविध आजार होऊन जगभरात दरवर्षी सुमारे 7 लाख 25 हजार जणांना जीव गमवावा लागतो.