शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 4:18 PM

1 / 6
फिनलँड, लॅपलँड- युरोपसह आशिया खंडात ख्रिसमसचा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. ख्रिसमसची खरी मजा पाहायची असल्यास युरोपमधील ख्रिश्चनबहुल देशांना आवर्जून भेट दिली पाहिजे. ख्रिसमसचा खरा जल्लोष पाहायचा असल्यास फिनलँडच्या लॅपलँड शहराला भेट द्यावी. इथे मोठ्या प्रमाणात ख्रिसमसचं सेलिब्रेशन केलं जातं.
2 / 6
पोलंड, वॉरसा- पोलंडची राजधानी वॉरसामध्ये ख्रिसमसची अनोखी धूम पाहायला मिळते. पोलंडचं शहर हे ख्रिसमसबरोबर इतर सणांसाठी प्रसिद्ध आहे.
3 / 6
प्राग- ख्रिसमस पार्टीसाठी प्राग हे जगभरात प्रसिद्ध आहे. ख्रिसमसच्या दिवसांत प्रागमध्ये फिरण्याची एक वेगळीच मजा असते.
4 / 6
नेदरलँड, अॅमस्टरडॅम- नेदरलँडमधल्या अॅमस्टरडॅममध्येही ख्रिसमसची जबरदस्त धूम असते. ख्रिसमसच्या काळात इथे फक्त घरंच नव्हे, तर रस्तेही सजवले जातात.
5 / 6
डेन्मॉर्क, कोपेनहेगन- डेन्मॉर्कच्या कोपेनहेगन हे शहर ख्रिसमसच्या दिवसांत बर्फाच्या चादरीनं झाकोळलेलं असतं. बर्फ आणि विद्युत रोषणाईनं सजलेले डोंगर पाहण्याची वेगळीच मजा आहे.
6 / 6
स्वित्झर्लंड, झुरीच- स्वित्झर्लंडमधील झुरीच हे फारच सुंदर शहर आहे. ख्रिसमसमध्ये या शहरात जोरदार सेलिब्रेशन असतं.
टॅग्स :Christmasनाताळ