शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia-Ukraine Crisis: अफगाणिस्तान ताब्यात घेणाऱ्या तालिबानचा रशियाला शांततेचा सल्ला; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 4:12 PM

1 / 9
काबूल: आताच्या घडीला संपूर्ण जगाचे लक्ष रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाकडे (Russia-Ukraine Conflict) लागले आहे. हा संघर्ष लवकरात लवकर शमावा, यासाठी अन्य देशांकडून प्रयत्न केले जात आहे. अमेरिकेने रशियावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.
2 / 9
रशिया आणि युक्रेन संघर्षावर जगभरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अनेक देशांनी रशियाचा निषेध केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तावर हल्ला करत ताबा घेणाऱ्या तालिबानने रशियाला महत्त्वाचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे.
3 / 9
तालिबानने दोन्ही देशांनी संयम बाळगावा तसेच हिंसाचार वृद्धिंगत करणारी वृत्ती न स्वीकारण्याचे आवाहन केले. बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानवर ताबा मिळवलेल्या तालिबानने रशिया आणि युक्रेनला हे संकट सोडवण्यासाठी वाटाघाटी करण्याचा सल्ला दिला.
4 / 9
या संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून असल्याचे तालिबानने सांगितले. तालिबानने नागरिकांच्या जीवितहानीच्या शक्यतेवर चिंता व्यक्त केली आहे. तालिबानने संपूर्ण संकटावर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले.
5 / 9
तालिबाननचे हे वक्तव्य अशावेळी जारी केले आहे, जेव्हा त्यांनी काही महिन्यांपूर्वीच एका रक्तरंजित हल्ल्यानंतर स्वतःची सत्ता काबीज केली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात अफगाण सैनिक मारले गेले.
6 / 9
दरम्यान, अमेरिकेच्या एका माजी वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने न्यूजवीकला सांगितले की, लष्करी संपल्यानंतर आणि प्रत्यक्षात जमिनीवर युद्ध सुरू झाल्यानंतर, मला वाटते की काही दिवसांत कीव कोसळेल. सैन्य जास्त काळ टिकणार नाही.
7 / 9
हा हल्ला रोखण्यासाठी युक्रेनच्या लष्कराशिवाय कोणतेही सैन्य पाठवले जाणार नाही, असे नाटो आणि अमेरिकेने स्पष्ट केले आहे. दीर्घ, रक्तरंजित आणि भयंकर युद्धासाठी ते जवळजवळ निश्चितपणे विजयी होईल, अशी काहींची अपेक्षा आहे.
8 / 9
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष शेजारच्या देशांमध्ये पसरण्यापासून रोखण्यासाठी नाटोने आपले प्रयत्न केंद्रित करणे अपेक्षित आहे. युतीचा सदस्य असलेल्या पोलंडची युक्रेनशी विस्तृत जमीन सीमा आहे, असे सांगितले जात आहे.
9 / 9
याशिवाय, कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. २०१४ नंतर प्रथमच ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल १०५ डॉलरच्या वर पोहोचली आहे. ब्रेंट क्रूड ८.५ टक्क्यांनी वाढून १०५.०८ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक ऊर्जा पुरवठ्याशी संबंधित चिंता वाढली आहे.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाTalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान